भुवनेश्वर: ओदिशात हनीट्रॅपमुळे सुरू झालेला वादंग थांबताना दिसत नाही. काही महिन्यांपूर्वीच ओदिशातील चित्रपट निर्माता अक्षय परीजानं एका जोडप्यावर गंभीर आरोप केले. आपल्याला हनीट्रॅप करण्यात आल्याचा दावा केला. या जोडप्याची चौकशी झाली आणि ओदिशातील नेत्यांची, मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची मोठी यादी समोर आली. आता या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.

मी तोंड उघडलं तर सगळं काही बदलेलं, असा धमकीवजा इशारा हनीट्रॅप प्रकरणातील आरोपी अर्चनानं दिला आहे. हनीट्रॅपनं ओदिशाच्या राजकारणात वादळ निर्माण झालं आहे. अनेकांना हनीट्रॅप करणाऱ्या जोडप्याची चौकशी सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) सुरू केली आहे. मुख्य आरोपी अर्चनान नागनं केलेल्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मला चुकीच्या पद्धतीनं गोवण्यात आलं आहे. मी तोंड उघडलं तर राज्यात परिवर्तन होईल, असा सूचक इशारा तिनं दिला आहे.
बायको घरमालकासोबत ल्युडो खेळू लागली; स्वत:ला पणाला लावून हरली, पतीला कॉल केला अन् मग…
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ आमदार, ३ मंत्री, अनेक मोठे अधिकारी आणि प्रसिद्ध व्यक्तींना अर्चना नागनं तिच्या पतीसह जाळ्यात ओढलं. आता अर्चनानं ओदिशा पोलिसांवर सनसनाटी आरोप केले आहेत. ओदिशा पोलिसांनी मला चुकीच्या पद्धतीनं पोलीस ठाण्यात ६० तासांहून अधिक वेळ ताब्यात ठेवलं. यादरम्यान माझा मानसिक छळ केला. यादरम्यान माझ्या वृद्ध आई वडिलांना भेटायची परवानगीदेखील दिली नाही, असे आरोप अर्चना नागनं केले.

कोण आहे अर्चना नाग? कोट्यवधींची संपत्ती कशी कमावली?
ओदिशाच्या बोलांगीर जिल्ह्यातील एका सामान्य घरात जन्मलेली अर्चना २०१५ मध्ये राजधानी भुवनेश्वरला पोहोचली. इंटिग्रेटेड लॉ कोर्ससाठी प्रवेश केला. एका खासगी सुरक्षा कंपनीत नोकरी सुरू केली. काही महिन्यांत नोकरी सोडली. एक ब्युटी सलून सुरू केलं. २०१७ मध्ये तिची ओळख बालासोरमध्ये वास्तव्यास असलेल्या जगबंधु नावाच्या तरुणाशी झाली. जगबंधु अतिशय महत्त्वाकांक्षी होता. तो गावात किराणा दुकान चालवायचा. दोघांचं सूत जुळलं. त्यांनी लग्न केलं. कमी वेळात आणि कमी श्रमात श्रीमंत व्हायचं अर्चनाचं स्वप्न होतं. त्यातूनच हनी ट्रॅपिंगला सुरुवात झाली.
नगरमध्ये भजनं गात फिरायचा; पोलीस आले, धरून नेले; ४९ वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याचे गूढ उकलले
बेड, ब्लॅकमेलिंग अन् कोटींचा खेळ
बड्या नेत्यांना, प्रसिद्ध आणि श्रीमंत लोकांना जाळ्यात अडकवण्याचा खेळ दोघांनी सुरू केला. त्यासाठी अतिशय सुनियोजितपणे कारस्थानं रचली. जगबंधु बड्या लोकांशी ओळख काढायचा. स्वत:चा परिचय एका राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून करून द्यायचा. अर्चना स्वत:ची ओळख वकील सांगायची. दोघे त्यांच्या घरी बड्या असामींना जेवायला बोलवायचे. नशा चढेल असे पदार्थ त्यांच्या जेवणात मिसळायचे. आपल्या शिकारीला बेडपर्यंत न्यायचे. मग लपवलेल्या कॅमेऱ्यांच्या मदतीनं त्यांचे अश्लिल व्हिडीओ चित्रित करायचे. त्यांच्या मदतीनं ब्लॅकमेलिंग आणि वसुली करायचे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here