नवी दिल्ली: कतारमध्ये फिफा वर्ल्डकप २०२२ ही स्पर्धा आता नॉकआउट स्टेजला पोहचली आहे. विजेतेपदाच्या दावेदारांमध्ये लियोनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाचा समावेश आहे. अर्जेंटिनाने क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता येथे त्यांची लढत नेदरलँड्सविरुद्ध होईल. या लढतीसाठी अर्जेंटिनाचा संघ जितकी तयारी करत आहे त्यापेक्षा जास्त उत्सुकता चाहत्यांना आहे. अशाच एका महिला फॅनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

स्टार फुटबॉलपटू मेस्सीची चाहती असलेली मिस बम बम सध्या चर्चेत आली आहे. तिचे खरे नाव सूजी कार्टेज आहे. मॉडल असलेली ३५ वर्षीय मिस बम बमचा दावा आहे की या वर्षी कतारमधील फुटबॉल वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनाचा विजय होईल.

मिस बम बमने मेस्सीबाबत एक मोठी आणि खास घोषणा देखील केली आहे. बम बमने स्वत:च्या शरीरावर मेस्सीचे सर्वात मोठे टॅटू काढणार असल्याचे म्हटले आहे. हे टॅटू ती अंतर्गत ठिकाणी काढणार आहे. विशेष म्हणजे याआधी तिने शरीरावर मेस्सीचे सात टॅटू काढले आहेत. यावेळी मेस्सीचे जे टॅटू ती शरीरावर काढणार आहे ते तिने याआधी पायावर काढलेल्या टॅटू प्रमाणे असेल. ज्यात जर्सी नंबर सोबत बॉलचा फोटो देखील असेल.

ब्राझिलियन ब्यूटी पीजेंट विजेती असलेल्या मिस बम बम नेहमी सोशल मीडियावर मेस्सीच्या जर्सी सोबतचा फोटो शेअर करत असते. मेस्सीचे ७ टॅटू काढल्यानंतर आता ती नव्या टॅटूची तयारी करत आहे. या नव्या टॅटूनंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझा समावेश होईल. मी जेव्हा इंटीमेट टॅटू काढले होते तेव्हा लोक हैराण झाले होते. पण आता त्यांना समजले असेल की मी टॅटू का काढले.

एका रिपोर्टनुसार सूजी कॉर्टेज ही मेस्सीसाठी इतकी वेडी आहे की, तिने मेस्सीला स्वत:चे अनेक हॉट आणि सेक्सी फोटो शेअर केले होते. पण मेस्सीने तिला ब्लॉक केले आहे.


4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here