live wire falls on railway official: फलाटावर उभा राहून आपल्या सहकाऱ्याशी बोलत असलेल्या तिकीट निरीक्षकाच्या डोक्यावर हायव्होल्टेज तार पडली. करंट लागताच टीसी खाली कोसळला. रेल्वे रुळांकडे पाठ करून उभा असलेला टीसी करंट लागताच मागे कोसळला. त्याच्या डोक्याकडचा भाग रुळांवर पडला. घटनेमुळे रेल्वे स्थानकात खळबळ उडाली. टीसीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती अतिशय गंभीर आहे.

सुजान सिंह यांच्यासोबत असलेल्या निरीक्षकाला घडलेला प्रकार पाहून धक्काच बसला. त्यांनी घटनेची माहिती आरपीएफ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. सुजान सिंह यांना त्वरित खडगपूर रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांचं एक पथक त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेऊन आहे. घटना अवघ्या काही सेकंदांत घडली. त्यामुळे कोणाच्याच काही लक्षात आलं नाही.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.