वाचा:
‘छावा’ संघटनेचे प्रमुख यांनी या संदर्भातील एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ‘दुधाला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. त्यांना दिलासा द्यायचा असेल तर राज्य सरकारनं दुधाला लिटरमागे पाच ते दहा रुपयांचं अनुदान देणं गरजेचं आहे, अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे. याच मागणीसाठी काल विरोधी पक्ष भाजप रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर आज सत्ताधारी आघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात आंदोलन सुरू आहे. सांगली, साताऱ्यातही शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.
याच पार्श्वभूमीवर छावा संघटनेनं प्रतिकात्मक आंदोलन करून लक्ष वेधून घेतलं आहे. ‘एखादं संकट टाळायचं असल्यास देव पाण्यात घालण्याची प्रथा आपल्याकडं आहे. सध्या दुधाला कमी भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांवर संकट आलं आहे. हे संकट दूर व्हावं म्हणून ‘छावा’चे नेते धनंजय जाधव यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची प्रतिमा दुधात ठेवून साकडं घातलं आहे. सरकारचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हेच शेतकऱ्यांची समस्या सोडवू शकतात. त्यामुळं त्यांनी हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी ‘छावा’ने केली आहे.
वाचा:
‘दुधाला प्रति लिटर पाच ते दहा रुपये अनुदान द्या. दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी पूर्णपणे काढून टाकण्यासाठी पाठपुरावा करा,’ अशी मागणी ‘छावा’नं मुख्यमंत्र्यांकडं केली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास लॉकडाऊन उठताच उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जाधव यांनी दिला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times