Maharashtra Weather : राज्यात वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठे थंडीचा जोर आहे, तर कुठे ढगाळ वातवरण असल्याचे जाणवत आहे. तर कुठे पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. परभणी (parbhani) आणि धुळे (Dule) जिल्ह्यात तापामानाचा (Temperatures) पारा कमालीचा घसरला असून, थंडीचा कडाका (Cold Weather) वाढला आहे. परभणी जिल्ह्यात तापमानाचा पारा 6.3 अंशावर आला असल्यानं नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. तर दुसरीकड धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा  7.5 अंशावर आला आहे.

ठिकठिकाणी पेटल्या शेकोट्या

परभणी आणि धुळे जिल्ह्यात तापामानाचा पारा चांगलाच घसरला आहे. त्यामुळं थंडीत वाढ झाली आहे. थंडी वाढल्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. मागचा आठवडाभरापासून गायब झालेली थंडी  पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यात परतली आहे. जिल्ह्यात थंडीचा जोर चांगलाच वाढली आहे. आज जिल्ह्याचे तापमान हे 6.3 अंशावर गेलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा जिल्हाभरामध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. आज सर्वत्र गार वारे सुटले असून जिल्हा चांगलाच गारठला आहे. काल जिल्ह्याचे तापमान हे 14.04 अंशावर होते. आज हेच तापमान घसरून 6.3 अंशावर आले आहे. 

धुळे जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला 

धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळं काही प्रमाणात थंडी कमी झाली होती. तसेच नागरिकांना उकाडा जाणवत होता. मात्र, काल रात्रीपासून थंडीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. जिल्ह्यातील तापमान 7.5 अंशावर आले आहे. त्यामुळं कडाक्याच्या थंडीत वाढ झाली आहे. ढगाळ वातावरणाचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, कडाक्याच्या थंडीत वाढ झाल्यानं या वाढत्या थंडीचा चांगला परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर होणार आहे.

News Reels

 मंदोस चक्रीवादळाचा परिणाम होणार

दरम्यान, मंदोस चक्रीवादळामुळं तामिळनाडू (Tamilnadu) आणि पुद्दुचेरीमध्ये (Puducherry) मध्यम ते जोरदार पावसाचा (Rain) अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे. हवामान विभागानं तामिळनाडू राज्यातील अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये आज (8 डिसेंबर) शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी होणार आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळं महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. अशातच परभणी आणि धुळे जिल्ह्यात मात्र, तापमानाचा पारा घसरुन थंडीत वाढ झाल आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:

Cyclone News : चक्रीवादळ आज चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकणार, तामिळनाडूत मुसळधार पावसाचा अंदाज, महाराष्ट्रात काय स्थिती?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here