उत्तर प्रदेशच्या बांदामध्ये एक विचित्र घटना घडली. एका तरुणीच्या प्रियकराला तिच्या नातेवाईकांनी चोर समजून मारहाण केली. रक्तबंबाळ झालेल्या तरुणाला जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. तिथे त्याच्यावर प्रथमोपचार झाले. त्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी हायर सेंटरला पाठवण्यात आलं. बिसंडा येथील गावात हा प्रकार घडला.

तरुणाला घरात शिरताना मुलीच्या वडिलांनी आणि भावांनी पाहिलं. त्यांनी चोर समजून त्याला बेदम मारहाण केली. आरडाओरडा ऐकून आसपासचे लोक जमले. शेजाऱ्यांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत केलं. यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तरुणाच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
एक तरुण डीजे वाजवण्यासाठी गेला होता. परतत असताना तो एका तरुणीच्या घरी गेला. त्यामुळे त्याला मारहाण झाली. पीडित तरुणाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती बिसंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी आनंद कुमार यांनी दिली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.