भागधारकांसाठी फायदेशीर
१३ डिसेंबर रोजी संचालक मंडळाची बैठक होणार आहे ज्यामध्ये बायबॅकवर निर्णय घेतला जाईल, असे पेटीएमने नियामक फाइलिंगमध्ये स्टॉक एक्सचेंजला कळवले आहे. कंपनीची सध्याची रोख आणि आर्थिक स्थिती लक्षात घेता बायबॅक भागधारकांसाठी फायदेशीर ठरू शकते, असे कंपनीच्या व्यवस्थापनाचे मत आहे. तसेच या प्रस्तावाला बोर्डाची मान्यता मिळाल्यास कंपनीची हा पहिला बायबॅक असेल.
आयपीओ किमतीवरून ७५% खाली घसरला शेअर
पेटीएमचे शेअर्स नोव्हेंबर २०२१ मध्ये बाजारात सूचिबद्ध झाले. कंपनीने २,१५० रुपये प्रति शेअर या दराने आयपीओ जारी केला होता. मात्र स्टॉकची लिस्टिंग झाल्यापासून घसरणीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच लॉक-इन कालावधी संपल्यानंतर २,१५० रुपयांचा शेअर ४४० रुपयांपर्यंत घसरला. म्हणजे आयपीओ किमतीच्या सुमार ८० टक्क्यांपेक्षा शेअर खाली पडला आहे. कंपनीकडे ९,००० कोटी रुपयांचा राखीव रोकड आहे, ज्याद्वारे बायबॅक केले जाईल.
सध्या बायबॅकच्या बातम्यांनंतर शेअर ४.६२ टक्क्यांच्या वाढीसह ५३१ रुपयांवर व्यवहार करत आहे. पण तो अजूनही ७५ टक्के इश्यू किंमतीच्या खाली आहे. कंपनीचे मार्केट कॅप यापूर्वी १.३९ लाख कोटी होते जे आता ३४,४७३ कोटी रुपये इतके र्हायले आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांचे १.०५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आता आश्चर्याची बाब म्हणजे २,१५० रुपयांना शेअर्स विकणारी पेटीएम गुंतवणूकदारांकडून स्वस्त दरात शेअर्स विकत घेण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
शेअर बायबॅक म्हणजे काय?
साधारणतः गुंतवणूकदार एखाद्या कंपनीचे शेअर्स घेऊन त्यात गुंतवणूक करतात पण बायबॅक त्याच्या उलट आहे. कंपनी गुंतवणूकदाराकडून ठरवलेल्या विशिष्ट किंमतीत शेअर्स खरेदी करते. याचे कारण म्हणजे कंपनीकडे अतिरिक्त रोकड असते, जी कंपनी स्वतःच्या प्रगतीसाठी वापरते किंवा तशी वापरण्याजोगी नसेल तर अतिरिक्त रोकडच्या मदतीने गुंतवणूकदारांकडून शेअर्स खरेदी करुन स्वतःचा हिस्सा वाढवते. लक्षात घ्या की याचा फायदा गुंतवणूकदारांसह कंपनीच्या वाटचालीवर देखील होतो.