नवी दिल्ली: प्रत्येक कंपनीतील कर्मचाऱ्यांना काही सुट्ट्या मिळतात. यापैकी काही सुट्ट्या अशा असतात ज्या जर तुम्ही घेत नाहीत तर त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतात. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगार रचनेत माहिती देण्यात येते. याला लीव्ह एनकॅशमेंट म्हणतात. पण तुम्ही एका वर्षात किती सुट्ट्या कॅश करू शकता याची संपूर्ण माहिती असायला हवी. कंपनी कोणत्या आधारावर सुट्ट्या एनकॅश करते हे तुम्हाला माहित असले पाहिजे.

सुट्ट्यांचे किती प्रकार
संघटित क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुट्ट्या देतात. यामध्ये आजारी रजा (सिक लिव्ह), प्रासंगिक रजा, अर्जित रजा आणि विशेषाधिकार यांचा समावेश आहे. यापैकी, जर तुम्ही कॅलेंडर वर्षात आजारी आणि आकस्मिक रजा वापरली नाही तर ती संपते म्हणजे लॅप्स होते. परंतु अर्जित रजा आणि विशेषाधिकार रजेच्या बदल्यात पैसे घेतले जाऊ शकतात. म्हणजेच तुम्ही त्यांना कॅश करू शकता. मात्र, या सुट्ट्या एन्कॅश करण्याचे नियम कंपन्यांसाठी भिन्न असू शकतात.

पती-पत्नी आणि पेन्शन! विवाहितांसाठी पोस्ट ऑफिसची विशेष योजना, थेट खात्यात जमा होईल मोठी रक्कम
किती दिवसांच्या सुट्या एनकॅश होतात

सामान्यतः एका कॅलेंडर वर्षात जास्तीत जास्त ३० सुट्ट्यांच्या बदल्यात पैसे घेण्याचा नियम आहे. सरकार एका वर्षात ३० सुट्ट्यांच्या रजा रोखीकरणावर सूट देते. मात्र, या बाबतीत कंपन्यांचे नियम वेगळे असू शकतात. अनेक कंपन्या वर्ष संपल्यानंतरच सुट्या एन्कॅश करतात. त्याचबरोबर काही कंपन्या कर्मचार्‍याच्या राजीनाम्यानंतर सुट्ट्यांचे पैसे पूर्ण आणि अंतिम स्वरूपात देतात.

नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी; आता तुमचा PF दावा वारंवार फेटाळला जाणार नाही, कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
पेमेंटसाठी नियम
आता उरलेला सुट्ट्यांचे पैसे कशाच्या आधारे मिळतायत हा प्रश्न उपस्थित होतो. सर्वप्रथम रजा दिवसागणिक दिली जाते, हा जर तुमचा समज असेल तर तो दूर करा. रजा रोख रक्कम कर्मचार्‍यांच्या मूळ पगारावर आणि डीएवर अवलंबून असते आणि त्यानुसारच पेमेंट केले जाते. मात्र, रजा रोखीकरणाचा सरकारी नियम आहे. रजा रोखीकरणाची सुविधा कंपन्यांवर अवलंबून असते.

भाड्याच्या घरात राहता पण HRA मिळत नाही, जाणून घ्या घरभाड्यावर कशी मिळेल कर सवलत; काय आहेत नियम
टॅक्स भरावा लागतो का?
रजा रोखीकरण (लिव्ह एनकॅशमेंट) कराच्या कक्षेत येते. हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग मानला जातो. नोकरीत असताना रजा रोखून घ्यायची असेल, तर ती तुमच्या पगाराचा भाग मानली जाते. एका कॅलेंडर वर्षाच्या समाप्तीनंतर ते एकदाच रिडीम केले जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here