shraddha walkar murder case: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते किरीट सोमय्यांची भेट घेतल्यानंतर विकास वालकर यांनी पत्रकार परिषद घेतली. दिल्ली पोलिसांच्या तपासाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. श्रद्धाच्या गुन्हेगारांना कठोर शासन होईल असा शब्द फडणवीसांना दिल्याचं वालकर यांनी सांगितलं. दिल्ली पोलीस आणि वसई पोलीस संयुक्तपणे गुन्ह्याचा तपास करत आहेत. न्यायालयावर, न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास असल्याचं वालकर म्हणाले.

 

shraddha father
मुंबई: श्रद्धाच्या मृत्यूचं आम्हाला दु:ख आहे. आम्ही आमचं दु:ख कधीच विसरू शकणार नाही. आम्हाला न्याय मिळेल असा शब्द दिल्ली पोलिसांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. श्रद्धाला अतिशय क्रूरपणे संपवणाऱ्या आफताब पुनावाला कठोर शिक्षा व्हावी. त्याच्या कुटुंबियांची चौकशी व्हावी. ते दोषी आढळल्यास त्यांनाही शासन व्हावं, अशी आशा श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते किरीट सोमय्यांची भेट घेतल्यानंतर विकास वालकर यांनी पत्रकार परिषद घेतली. दिल्ली पोलिसांच्या तपासाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. श्रद्धाच्या गुन्हेगारांना कठोर शासन होईल असा शब्द फडणवीसांना दिल्याचं वालकर यांनी सांगितलं. दिल्ली पोलीस आणि वसई पोलीस संयुक्तपणे गुन्ह्याचा तपास करत आहेत. न्यायालयावर, न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास असल्याचं वालकर म्हणाले.
चार महिने फ्रिजमध्ये होते तुकडे, आफताब चिंतेत; ‘त्या’ मित्राच्या घरात ट्युब पेटली अन् मग…
दिल्ली पोलिसांचा तपास व्यवस्थित सुरू आहे. त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. मात्र या प्रकरणात सुरुवातील स्थानिक पोलिसांनी असहकाराची भूमिका घेतली. त्यामुळे मला त्रास झाला. तुळींज आणि माणिकपूर पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेची चौकशी व्हायला हवी. त्यांनी असहकार्याची भूमिका घेतली नसती तर माझी मुलगी जिवंत असती किंवा काही पुरावे मिळण्यात मदत झाली असती, अशा शब्दांत वालकर यांनी स्थानिक पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
सगळ्यात महागडा खटला LIVE पाहिला; ‘ती’ केस बघून आफताबचा दिल्ली, मुंबई पोलिसांना गुंगारा
आफताबचं कृत्य अत्यंत क्रूर आहे. त्याबद्दल त्याला शिक्षा व्हायला हवी. त्याच्या कुटुंबियांची चौकशी होणंदेखील गरजेचं आहे. त्यात कोणी दोषी आढळल्यास त्यांनाही शासन व्हायला हवं. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग असल्यास त्यांनाही शिक्षा व्हायला हवी, असं वालकर म्हणाले. खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर किरीट सोमय्या आणि नीलम गोऱ्हेंनी माझी आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्याबद्दल वालकर यांनी त्यांचे आभार मानले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here