girls beats father: वडिलांनी आईस्क्रीम फेकल्याचा राग आल्यानं दोन मुलींनी त्यांना मारहाण केली. मुलींनी वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारलं. त्यांचं डोकं भिंतीवर आपटलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

ice crea,
पुणे: आईस्क्रीम फेकल्याच्या रागातून मुलींनी वडिलांना आईच्या मदतीनं मारहाण केल्याचा प्रकार पुण्यातील वडगाव शेरीत घडला आहे. मुलींनी आणलेलं आईस्क्रीम वडिलांनी फेकून दिलं. त्यामुळे संतापलेल्या मुलींनी वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांचं डोकं भिंतीवर आपटलं. या प्रकरणी वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पीडितेच्या पत्नी आणि मुलींविरोधात गुन्हा दाखल केला.

वडगाव शेरी भागात वास्तव्यास असणारे सतीश जाधव (५१) नेहमीप्रमाणे २ डिसेंबरला घरी आले. त्यावेळी त्यांच्या मुली स्नेहल आणि तेजस्वी आईस्क्रीम घेऊन आल्या होत्या. मुलींनी वडिलांना आईस्क्रीम दिले. त्यावर मी ४ चपात्या खाणारा माणूस आहे. या आईस्क्रीमनं माझे पोट भरणार नाही, असं म्हणत सतीश यांनी आईस्क्रीम फेकून दिलं.
नवऱ्यावर विषप्रयोग करणारी बायको स्वत:ही केमिकल प्यायली; ब्लड टेस्टचा रिपोर्टही आला, पण…
बाहेरून पैसे देऊन आणलेले आईस्क्रीम फेकून दिलं याचा राग दोन्ही मुलींना आला. दोघींनी आईच्या मदतीनं वडिलांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांचे डोकं भिंतीवर जोरात आपटलं. भिंतीवर डोके आपटल्यानं जाधव यांच्या मेंदूला जबर मार बसला असून ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी आई आणि मुलींवर विश्रांतवाडी पोलस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३२३, ३३७, ३३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here