Rohit Sharma : रोहित शर्माला दुखापत झाली. त्यामुळे रोहित आता वनडे मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण रोहितला यावेळी दुखापत झाली असली तरी त्याचे एक ट्विच सध्याच्या घडीला जगभरात व्हायरल झाले आहे आणि त्याचीच चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. रोहितच्या या ट्विटमध्ये असं नेमकं आहे तरी काय, जाणून घ्या…

हायलाइट्स:
- रोहित शर्मा दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर गेला आहे.
- पण रोहितचे एक ट्विट आता चांगलेच व्हायरल झाले आहे.
- या ट्विटमध्ये रोहितने नेमकं काय म्हटलं आहे, जाणून घ्या…
दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माला गंभीर दुखापत झाली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली. नंतर संघ हरताना पाहून तो आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. रोहितने यावेळी संघाला जिंकवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. हिटमॅनने संघासाठी फटकेबाजी करताना अर्धशतक झळकावले, मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. पण त्यानंतर एक अपडेट समोर आली की तो तिसरा आणि शेवटचा वनडे सामना खेळू शकणार नाही. रोहित आता दुखापतीमुळे कसोटी मालिका खेळणार की नाही, याबाबत अजूनही स्पष्ट निर्णय समोर आलेला नाही. पण रोहितच्या एका ट्विटने मात्र जगभरात त्याची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.
रोहित शर्माने आपल्या या ट्विटमध्ये दोन वाक्य लिहिली आहेत. रोहितने या ट्विटमध्ये तो फलंदाजीसाठी मैदानात उतरत असतानाचा फोटो लावला आहे. रोहितने त्यानंतर या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ” मी फक्त संघासाठी मैदानात उतरत नाही, तर मी माझ्या देशासाठी मैदानात उतरतो.” दुखापतीनंतर रोहितचे हे ट्विट आता चांगलेच व्हायरल झाले आहे. कारण बोटाला गंभीर दुखापत होऊनही रोहित या सामन्यासाठी देशासाठी फलंदाजीला उतरला होता.

रोहित जेव्हा फलंदाजीला आला होत,तेव्हा भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता. पण रोहितने फलंदाजीला आल्यावर धडाकेबाज फटकेबाजी केली आणि आपले अर्धशतकही झळकावले. रोहितने हा सामना अखेरचा चेंडूपर्यंत नेला होता. अखेरच्या चेंडूवर भारताला विजयासाठी सहा धावांची गरज होती आणि त्यावेळी रोहित शर्मा हा स्ट्राइकवर होता. त्यामुळे रोहितने षटकार खेचला असता तर भारतीय संंघ हा सामना जिंकू शकला असता. पण या चेंडूवर रोहितला षटकार खेचता आला नाही आणि त्यामुळे भारताचा पाच धावांनी पराभव झाला. पण रोहितने यावेळी आपल्या दुखापतीची तमा बाळगली नाही आणि तो देशासाठी मैदानात उतरला. रोहितचे हे ट्विट त्याच्या या गोष्टीशी जुळणारे आहे. त्यामुळेच रोहितने जे २०१९ साली जे ट्विट केले होते ते आता चांगलेच व्हायरल झालेले आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
เกมสล็อต ให้ทดลองเล่นฟรีและยังเป็นเว็บไซต์ PG SLOT 12iwins จบทุกค่ายเกมดัง สำหรับนักพนันออนไลน์
SexyPG888 เว็บเดิมพันออนไลน์ สมัคร สล็อต เว็บ ตรง ที่นักเดิมพันนิยมเล่นเป็นอันดับ 1 ของประเทศไทย เว็บตรง ที่ดีที่สุดในตอนนี้