नवी दिल्ली: केंद्र सरकारने देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून लोकांना छिद्रयुक्त श्वसनयंत्र लावलेले घालण्याबाबत इशारा दिला आहे. या मास्कमुळे विषाणूचा प्रसार थांबणार नसल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. या बरोबरच कोविड -१९ हा साथीचा आजार थांबविण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांच्या ते “विपरित” आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालक राजीव गर्ग यांनी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना एक पत्र लिहून एन-९५ मास्कबाबत आपले म्हणणे मांडले आहे. अधिकृत आरोग्य कर्मचा-यांच्या जागी सर्वसामान्य लोक अयोग्यपणे एन—९५ मास्कवापरत आहेत, असे निदर्शनास आले आहे, विशेषत: ज्या मास्कला छिद्रयुक्त श्वसनयंत्र बसवले आहे, असे हे मास्क आहेत.

राजीव गर्ग पुढे म्हणतात की, छिद्रयुक्त श्वसनयंत्र असलेल एन- ९५ मास्क कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या काळजीच्या विपरीत आहे. कारण हा मास्क करोनाचा विषाणू मास्कबाहेर येण्यापासून रोखत नाही. हे लक्षात घेता, चेहरा/तोंड झाकावे आणि एन-९५ मास्कचा अयोग्य वापर रोखण्यासाठी तुम्ही सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात, असे आम्ही आपल्याला सूचित करत आहोत.

वाचा:

बाहेर निघताना या गोष्टींवर लक्ष द्या

सरकारने एप्रिल महिन्यात दिशा-निर्देश जारी केले होते. त्या नुसार, लोकांनी घरी तयार केलेले फेस/माउथ कव्हरचा उपयोग करण्यास सांगण्यात आले होते. जेव्हा केव्हा तुम्ही घरातून बाहेर निघाल तेव्हा नेहमीच मास्कचा वापर करा असे सांगणयात आले होते. घरी तयार करण्यात आलेल्या मास्कचा उपयोग केल्यानंतर ते घुवावा असेही सांगण्यात आले होते. घरी मास्क तयार करण्यासाठी सूती कपड्याचा वापर करावा असे सांगण्यात आले होते. मीठ टाकलेल्या उकळत्या पाण्यात हा मास्क धुवावा अशी माहिती देण्यात आली होती.

वाचा:
मास्क घालण्यापूर्वी हात साबणाने धुतले पाहिजेत. तसेच एकदा मास्क घातल्यानंतर तो धुतल्याशिवाय पुन्हा त्याचा वापर करू नये असेही निर्देश देण्यात आले होते.

वाचा:

करोनाला रोखण्यासाठी एन-८५ हा मास्क अत्यंत सुरक्षित असल्याचे प्रचलित असल्याने लोकांचा ओढा मोठ्या प्रमाणावर हा मास्क वापराकडे झुलकेला आहे. बाजारात देखील लोक सर्वप्रथम एन-९५ मास्कची मागणी करताना दिसतात.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here