न्यूयॉर्क: जागतिक आणखी एका मानाच्या पदावर भारतीय व्यक्ती विराजमान झाली आहे. भारतीय वंशाची सुष्मिता शुक्ला यांची न्यूयॉर्कच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या प्रथम उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशाप्रकारे, सुशीला आता या प्रतिष्ठित सेंट्रल बँकेची दुसरी सर्वोच्च अधिकारी बनली आहे. न्यूयॉर्कस्थित सेंट्रल बँकेने निवेदन जाहीर केले आणि म्हटले की, शुक्ला यांच्या नियुक्तीला फेडरल रिझर्व्ह सिस्टमच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. ५४ वर्षीय शुक्ला मार्च २०२३ पासून बँकेतील पदभार सांभाळतील.

भारतीय वंशाच्या CEO’s चा डंका, गुगलपासून ट्विटरपर्यंत हाती जगभरातील दिग्गज कंपन्यांची कमान
सुश्मिता यांनी दिली माहिती
“न्यूयॉर्क फेड सारख्या संस्थेसाठी काम करण्याची संधी मिळाल्याचा मला सन्मान वाटतो,” असे शुक्ला यांनी एका निवेदनात म्हटले आहे. “माझ्या कारकिर्दीत मी शिकलेल्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग करेन, ज्यात माझे तंत्रज्ञान, ऑपरेशन्स आणि जोखीम-केंद्रित अनुभव यांचा समावेश आहे, या महत्त्वाच्या उपक्रमांना पुढे नेण्यासाठी आणि या महत्त्वाच्या संस्थेच्या समर्पित नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी,” त्यांनी पुढे सांगितले.

बापरे! भारतातील सीईओंना वर्षाला मिळतं घसघशीत पॅकेज, मिळतो ९ आकडी पगार
कोण आहे सुश्मिता शुक्ला
सेंट्रल बँकेचे अध्यक्ष जॉन विल्यम्स म्हणाले की, शुक्ला ऊर्जा, प्रेरणादायी आणि अतिशय प्रभावी आहेत, ज्यांनी त्यांचा दीर्घ अनुभव बँकेत आणला आहे. विल्यम्स म्हणाले की, शुक्ला यांना तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान आहे. मध्यवर्ती बँकेच्या वेबसाइटवर शुक्ला यांच्या प्रोफाइलनुसार त्यांना विमा उद्योगात सुमारे २० वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांनी विविध नेतृत्वाची भूमिका निभावली आहे. सुष्मिता शुक्ला यांनी विमा क्षेत्रात अनेक नेतृत्वाची भूमिका बजावली आहे. मुख्यतः त्यांनी ऑपरेशन्स, तंत्रज्ञान आणि कंपन्यांमध्ये मोठे बदल केले आहेत.

आर्थिक अडचणींवर मात करत बनला होता ट्विटरचा सीईओ पराग अग्रवालची Real Story
एवढेच नाही तर २०१८ पासून शुक्ला न्यूयॉर्कमधील जगातील सर्वात मोठी मालमत्ता आणि अपघात विमा कंपनी Chubb शी संबंधित आहे. त्या कंपनीत वरिष्ठ उपाध्यक्ष आणि सीओओ (आंतरराष्ट्रीय अपघात आणि आरोग्य) या पदावर कार्यरत होत्या. यापूर्वी त्यांनी जायंटबियर, मेरिल लिंच, लिबर्टी म्युच्युअल, द हार्टफोर्ड आणि हेल्थफर्स्टमध्ये काम केले आहे.

शिक्षण आणि कुटुंब
त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातून फायनान्समध्ये एमबीए केले आणि मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. सुष्मिता शुक्ला सध्या कनेक्टिकटमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात आणि त्यांना दोन मुली आहेत.

2 COMMENTS

  1. เกมสล็อต ให้ทดลองเล่นฟรีและยังเป็นเว็บไซต์ PG SLOT 12iwins จบทุกค่ายเกมดัง สำหรับนักพนันออนไลน์

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here