म. टा. प्रतिनिधी, मुंबईः ठाणे ते कल्याणदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगावदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवार ब्लॉकमध्ये रुळांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)

स्थानक – ठाणे ते कल्याण

मार्ग – पाचवा आणि सहावा

वेळ – सकाळी ९ ते दुपारी १पर्यंत

परिणाम – रविवारी सकाळी ९.५०ची वसई रोड-दिवा मेमू कोपर स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे. याच स्थानकातून या गाडीचा सकाळी ११.४५ वाजता परतीचा प्रवास सुरू होणार आहे.

हार्बर रेल्वे

स्थानक – सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे

मार्ग – अप आणि डाऊन

वेळ – सकाळी ११.४० ते दुपारी ४.४०

परिणाम – ब्लॉक वेळेत सीएसएमटी/वडाळा ते वाशी/ बेलापूर/ पनवेल अप-डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव अप-डाऊन लोकल फेऱ्या रद्द होतील. पनवेल ते कुर्ला (फलाट क्रमांक ८) दरम्यान विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे

स्थानक – बोरिवली ते गोरेगाव

मार्ग – अप आणि डाऊन धीमा

वेळ – सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३५

परिणाम – ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होतील. बोरिवली फलाट क्रमांक १, २, ३, ४वरून वाहतूक होणार नाही.

या गाड्या विलंबाने धावणार

११०१० पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, १७६११ हजूर साहिब नांदेड-मुंबई राज्य राणी एक्स्प्रेस, १२१२४ पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, १३२०१ पाटणा-एलटीटी एक्स्प्रेस, १७२२१ काकीनाडा-एलटीटी एक्स्प्रेस, १२१२६ प्रगती एक्सप्रेस, २२१२६ बनवा-एलटीटी एक्स्प्रेस, १२३२१ हावडा-मुंबई मेल, १२८१२ हटिया-एलटीटी एक्स्प्रेस आणि ११०१४ कोईम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस विलंबाने धावणार आहेत. ११०२९ मुंबई कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, ११०५५ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस आणि ११०६१ एलटीटी-जयनगर एक्स्प्रेस या गाड्या सुमारे पंधरा मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here