Authored by नयन यादवाड | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 10 Dec 2022, 9:09 am
Kolhapur local news | अंबाबाईच्या मंदिराबाहेर भाविकाची एक चूक नडली, चप्पल स्टँडवाल्याकडून पैसे परत देण्यास नकार. मंदिर परिसरात चप्पल स्टँड चालक गणेश पाकरे यांच्या चप्पल स्टँडवर आपले चप्पल सोडले. दर्शनानंतर चप्पल घेऊन जात असताना सदर दाम्पत्याने ऑनलाईन पद्धतीने १० रुपये पाकरे यांना दिले. मात्र, याच वेळी सदर दाम्पत्याकडून चुकून ८५०० रुपये चा आणखी एक व्यवहार (ट्रांजेक्शन) झाला.

हायलाइट्स:
- अंबाबाई मंदिरातल्या चप्पल स्टँड चालकाचा धिंगाणा
- पोलीस स्टेशनमध्येच काढले कपडे
- चोर तर चोर वर शिरजोर
तंत्रज्ञानाच्या युगात सर्व जण ऑनलाईन पेमेंटचा वापर करत आहेत.अगदी एक रुपया पासून ते करोडोची उलाढाल अगदी काही मिनिटात ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. मात्र, जरी हा व्यवहार करायला कमी वेळ लागत असला आणि आपला फायदा होत असला तरी दुसऱ्या बाजूला वेळ बचत करण्याच्या नादात ऑनलाईन व्यवहार करताना न घेतलेल्या काळजीने एका दाम्पत्याला पोलीस स्टेशन गाठावे लागले आहे.
सदरची घटना ही कोल्हापुरात घडली असून पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात बिहार राज्यातून एक उच्च शिक्षित दाम्पत्य देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी सदर दाम्पत्याने मंदिर परिसरात चप्पल स्टँड चालक गणेश पाकरे यांच्या चप्पल स्टँडवर आपले चप्पल सोडले. दर्शनानंतर चप्पल घेऊन जात असताना सदर दाम्पत्याने ऑनलाईन पद्धतीने १० रुपये पाकरे यांना दिले. मात्र, याच वेळी सदर दाम्पत्याकडून चुकून ८५०० रुपये चा आणखी एक व्यवहार (ट्रांजेक्शन) झाला. सदर प्रकार दांपत्यास कळताच त्यांनी पाकरे यांच्याकडे विचारणा करत पैसे पुन्हा देण्याची विनंती केली. मात्र, पैसे देण्याऐवजी चप्पल स्टँड धारकाने वाद घातला.
यामुळे सदर दाम्पत्यानी थेट जुना राजवाडा पोलिस स्टेशन गाठत पोलिसांकडे मदत मागितली. यावेळी पोलीस ठाण्याचे अमलदार यांनी सदर चप्पल स्टँड चालकाची चौकशी केली असता यावेळी ही चप्पल स्टँड चालकाने पोलिसांशी ही वादावादी करत सदर दाम्पत्याला शिवीगाळ करू लागला.तसेच पोलीस ठाण्यात येत पोलिसांसमोर कपडे काढत अर्धनग्न होत धिंगाणा घालू लागला. यामुळे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रचंड गोंधळ उडाला. ही सर्व घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांच्या कामात अडथळा आणि सदर दांपत्यास शिवीगाळ केल्या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी चप्पल स्टँड चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला तसेच धिंगाण्याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्याकडून जारी करण्यात आले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.