नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवर दबाव दिसून येत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू आहे. कच्च्या तेलाची किंमत ८० डॉलरच्या खाली घसरली आहे, पण देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. १० डिसेंबर, शनिवारी पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. गुजरात आणि हिमाचल, या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर इंधन दरांत सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाले, अशी लोकांना अपेक्षा होती, मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. देशातील बहुतांश भागात पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या आसपास असताना डिझेलने ९० रुपयांचा टप्पा गाठला आहे.

Maharaja’s Makeover: एअर इंडियात आधुनिकीकरणावर होणार इतक्या कोटींचा खर्च, केबिन सजवण्यासाठी…
आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे तर कच्च्या तेलाची किंमत ८० डॉलरच्या खाली घसरली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत ७६.१० डॉलरवर पोहोचली तर WTI क्रूडचा दर ७१.०२ डॉलरवर पोहोचला आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याचा परिणाम भारतात होताना दिसत नाही. शनिवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले असून तेलाच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशभरातील सर्व शहरांमध्ये वाहनांच्या इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही, राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत.

नवीन वर्षात खिसा रिकामा होणार! आरबीआयचा कर्जदारांना झटका, जाणून घ्या किती रुपयांनी वाढणार तुमचं EMI
मेट्रो शहरातील इंधनाचे दर
मोठ्या महानगरांबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत प्रति लिटर पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लीटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. याशिवाय मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये तर चेन्नईत एक लिटर पेट्रोलची किंमत १०२.६३ रुपये आणि डिझेलची किंमत ९४.२४ रुपये प्रति लीटर आहे. सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता इंधनाचे दर जारी करतात. यामध्ये सरकारी आणि राज्य कर, शिपिंग खर्च आणि डीलर कमिशन याच्यावर आधारित इंधनाच्या किमती निश्चित केल्या जातात.

कच्च्या तेलाच्या किमती निचांकी पातळीवर; अर्थमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा, पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
२२ मे पासून तेलाच्या किमती स्थिर
यावर्षी २२ मे पासून इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही. तेल कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जारी करतात. वाहनचालक आपल्या मोबाईल फोनच्या मदतीने त्यांच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमतही सहज जाणून घेऊ शकतात. ग्राहकांनी त्यांच्या फोनवरून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर तुमच्या शहरातील पेट्रोल पंपाचा कोड पाठवायचा आणि त्यांनतर त्यांना मेसेजद्वारे तेलाच्या ताज्या किमतींची माहिती मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here