मुंबई : महाराष्ट्र, हिमाचल आणि मणिपूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ३३मिनिटांत पृथ्वी तीन अवस्थेत हादरली. मणिपूरमधील चंदेल इथे सकाळी ११.२८ वाजता भूकंपाचे धक्के पहिल्यांदा जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.१ इतकी मोजली गेली. त्याचे केंद्र ९३ किमी खोलीवर होते. यानंतर दोन मिनिटांनी म्हणजे ११.३० वाजता हिमाचल प्रदेशातील चंबा इथे पृथ्वी हादरली. त्याची तीव्रता २.८ होती.

भूकंपाचा केंद्रबिंदू पाच किलोमीटर खोलीवर होता. यानंतर महाराष्ट्रातील नांदेडमध्ये दुपारी १२.०१ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.० इतकी मोजली गेली. त्याचे केंद्र ५ किमी खोलीवर होते. तिन्ही राज्यांमध्ये या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट’चा मार्ग मोकळा; खारफुटीच्या सुमारे २२ हजार झुडपांची होणार कत्तल
म्यानमारमध्येही भूकंपाचे धक्के

याच्या काही वेळापूर्वी म्यानमारमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.७ इतकी होती. त्याचे केंद्र ९५ किलोमीटर खोलीवर होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. दोन दिवसांपूर्वी इंडोनेशियामध्ये ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.

इंडोनेशियामध्ये ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आणि जावाच्या मुख्य बेटावर गुरुवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे राजधानी जकार्तामधील गगनचुंबी इमारती कित्येक सेकंद हादरत राहिल्या. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.८ इतकी मोजली गेली. त्याचे केंद्र पश्चिम जावा प्रांतातील सिरंजंग-हिलिरच्या वायव्येस १४ किलोमीटर अंतरावर १२३.७ किलोमीटर खोलीवर होते.

‘लव्ह जिहाद’च्या कायद्यासाठी अभ्यास सुरू, देवेंद्र फडणवीसांची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here