Samruddhi expressway Devendra Fadnavis drove car | समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. फडणवीस सरकारच्या काळातच या महामार्गासाठी जमीन हस्तांतरण करण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने हे काम पुढे नेले. महाविकास आघाडीकडूनच या महामार्गाचं लोकार्पण केलं जाईल, अशी चर्चा होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे फडणवीसांना आपल्याच कार्यकाळात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्याची संधी नव्याने चालून आली.

 

Samruddhi expressway
समृद्धी महामार्ग

हायलाइट्स:

  • देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर टेस्ट राईड घेतली होती
  • या दोघांनी नागपूर ते शिर्डी असा प्रवास केला होता
  • देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गाडी चालवत हे अंतर पार केले होते
मुंबई: राज्याताली अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या लोकार्पण सोहळ्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर टेस्ट राईड घेतली होती. या दोघांनी नागपूर ते शिर्डी असा प्रवास केला होता. विशेष गोष्ट म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गाडी चालवत हे अंतर पार केले होते. एकनाथ शिंदे यांच्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा केली. त्यांनी मला विचारले की, तुमचा समृद्धी महामार्गावरील प्रवास कसा झाला? तुमचा साथीदार कुठे आहे? मी देखील समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्यासाठी उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचा समृद्धी महामार्गावरील प्रवासाचाही अनुभव सांगितला. आम्ही समृद्धी महामार्गावर टेस्ट राईड घ्यायचे ठरवले त्यादिवशी देवेंद्र फडणवीस यांचा गाडी चालवायचा मूड होता. तेच म्हणाले, मी गाडी चालवतो, तुम्ही बाजूला बसा. मलाही गाडी चालवता येते. ज्या माणसाला गाडी चालवता येते, तो बाजूला बसला असेल तर त्याला फार भीती वाटत नाही. परंतु, मला गाडी चालवता येत असल्याने सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी वेगाने गाडी चालवली तेव्हा मला थोडी भीती वाटली. पण देवेंद्र फडणवीस पट्टीचे ड्रायव्हर निघाले, त्यांनी कमाल ड्रायव्हिंग केले, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Devendra Fadnavis: समृद्धी महामार्गावर गाडी १५०च्या स्पीडवर; फडणवीसांनी चालवलेली मर्सिडीज कोणत्या बिल्डरची?

देवेंद्र फडणवीसांचा सुस्साट स्पीड, ५२९ किलोमीटरचं अंतर पावणेपाच तासात कापलं

समृद्धी महामार्गावरील टेस्ट राईडवेळी देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल १५० किमीच्या स्पीडने गाडी चालवली होती. त्यावेळी अनेक ठिकाणी सत्कारासाठी थांबे घेत, जेवणासाठी थांबूनही फडणवीस आणि शिंदे यांनी नागपूर ते शिर्डी हे अंतर पावणेपाच तासांमध्ये पार केले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास शिंदे-फडणवीस गाडीने नागपुरहून निघाले होते. संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास शिंदे-फडणवीसांचा ताफा शिर्डीत पोहोचला. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी किती वेगात गाडी चालवली असावी, याची कल्पना आपण करु शकतो.
वंदे भारत १८०च्या स्पीडने धावली; तरीही पूर्ण भरलेल्या ग्लासातला एक थेंबदेखील सांडला नाही

समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची कशी समजूत काढली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारकडून वातावरणनिर्मिती केली जात आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच प्रसारमाध्यमांना विशेष मुलाखती दिल्या. या मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा कसा साकार झाला, याविषयी खुलासा केला. समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करताना स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला होता. एमएसआरडीसी खाते माझ्याकडे असल्याने या विरोधाचे कारण जाणून घेण्यासाठी मी बुलढाण्याला गेलो होतो. त्यावेळी पूर्वी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याची माहिती समोर आली. तेव्हा मी शेतकऱ्यांची समजूत काढून त्यांना राजी केले आणि त्यांच्या खात्यात मोबदल्याच रक्कम अवघ्या चार तासांत जमा केली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here