पोलिसांनी लग्नघरातून नवरदेवाला अटक केली. बलात्काराच्या आरोपात नवरदेवाला बेड्या पडल्या. त्यामुळे लग्नघरात एकच खळबळ उडाली. कुटुंबियांना, नातेवाईकांना जबर धक्का बसला. प्रेयसीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली. सध्या या प्रकरणात तपास सुरू आहे. लग्नाच्या काही तास आधी नवरदेवाला अटक झाल्यानं घटनेची चर्चा परिसरात आहे.

 

groom arrest
आग्रा: उत्तर प्रदेशच्या आग्र्यातमध्ये पोलिसांनी एका नवरदेवाला अटक केली आहे. बँडबाज्यासह वरात निघायच्या आधीच पोलिसांनी नवरदेवाला बेड्या ठोकल्या. लग्नासाठी निघालेल्या राहुलला पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली. हा प्रकार पाहून अनेकांना धक्का बसला. तरुणाच्या नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली. लग्नाच्या आधी राहुलला बलात्काराच्या आरोपात अटक झाल्याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली.

तीन वर्षांपूर्वी राहुलसोबत ओळख झाली. आम्ही दोघे एका कंपनीत सेल्स टीममध्ये काम करायचो. मैत्री झाली. तिचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली. लग्नाचं वचन देऊन राहुलनं अनेकदा शरीरसंबंध ठेवले. मात्र नंतर शब्द फिरवल्याचा आरोप पीडित तरुणीनं केला.
अरे हा तर… लग्नघटिका समीप असताना मंडपवाल्यानं नवऱ्याला ओळखलं; कुटुंब ‘सावधान’ झालं अन्…
राहुलनं वचनापासून मागे हटला. त्यानंतर पीडितेला राहुलचं लग्न मथुरेत ठरल्याचं समजलं. शुक्रवारी त्याच्या घरातून वरात निघणार असल्याचं कळताच पीडिता पोलीस आयुक्तालयात पोहोचली. तिनं तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीनं कार्यवाही सुरू केली. आरोपीचं घर गाठलं. तिथे लगीनघाई सुरू होती.
आई बाबा बाहेर गेलेत, घरी ये! प्रेयसीचा घायाळ करणारा कॉल, तरुण पोहोचला अन् खरंच घायाळ झाला
लग्नघरात पोलीस पोहोचताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी राहुलला अटक केली. त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं. राहुलची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. राहुलच्या अटकेमुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला. लग्नाच्या काही तास आधी नवरदेवाला अटक झाल्याच्या घटनेची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांना सांगितलं.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Get India news, latest marathi news headlines from all states of India. Stay updated with us to get latest India news in marathi.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here