शम्स यांचा जीवनप्रवास खूपच वेगळा होता. कधी काळी बिडी कंपनीचे मालक असलेले शम्स जालनवी अचानक शायरीकडे वळले आणि गझलेच्या याच प्रांतातच रमले. देशभरातील शेकडो मुशायऱ्यांतून त्यांनी आपली गझल सादर केली आणि गझलप्रेमींवर गारुड केले. शम्स जालनवी हे मागील ८० वर्षांपासून काव्यलेखन करीत होते. त्यांचे “”, “मध्यान का सूर्य ” काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. देश-विदेशातील अनेक मुशायर्यात शम्स सहभागी झाले.
वाचा:
कवी संमेलन असो किंवा गझलांची मैफल असो, ‘मेरा मन कितना पागल है’ या त्यांच्या गझलेसाठी हमखास फर्माइश येत असे. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी गझलवर प्रेम केले. दखनी परंपरेतील महत्त्वाचे कवी असलेल्या शम्स यांच्या निधनाबद्दल साहित्य क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times