पश्चिम बंगालमध्ये एका स्कॉर्पियोमधून काळ्या पैशांची वाहतूक सुरू होती. पोलिसांनी तपासणी नाक्यावर कार थांबली. संशय आल्यानं कारची झडती घेण्यात आली. त्यावेळी आतमध्ये तब्बल ९८ लाख रुपये सापडले. पैशांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली ट्रिक पाहून पोलिसांना धक्काच बसला.

तस्करी आणि खंडणीतून मिळालेल्या काळ्या पैशांची वाहतूक स्कॉर्पिओमधून सुरू असल्याचं पोलीस चौकशीतून समोर आलं आहे. कारच्या मालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कारमधील व्यक्तींविरोधातही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कारच्या स्टेपनीमध्ये सापडलेली माया पाहून पोलिसांना धक्काच बसला.
महिंद्रानं स्कॉर्पियो-एन जून २०२२ मध्ये लॉन्च केली. या कारला प्रचंड मागणी आहे. कारसाठी अनेकांनी बुकिंग केलं आहे. त्यामुळे प्रतीक्षा कालावधी २ वर्षांपर्यंत पोहोचला आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये ही कार वेगळ्याच कारणासाठी वापरली गेली. या घटनेचा व्हिडीओ रफ्तार ७८११ नावाच्या यूट्यूब चॅनलवरून शेअर करण्यात आला आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.