हरिओम सोमवारी बेपत्ता झाला. मात्र त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली नाही. मंगळवारी संध्याकाळी हरिओमचा मृतदेह गावाबाहेरील शेताजवळ आढळला. त्याचे दोन्ही हात कोपरापर्यंत कापण्यात आले होते. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केली. मात्र त्याचे हात सापडले नाहीत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. गळा दाबल्यानं, धारदार शस्त्रानं गळा कापल्यानं, डोक्यावर इजा झाल्यानं हरिओमचा मृत्यू झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं.
पोलिसांनी हरिओमचे वडील मोहनलालवर संशय आला. त्याची दोनदा चौकशी करण्यात आली. मात्र त्याच्या चौकशीत काही परस्परविरोधी गोष्टी आढळल्या. त्यामुळे त्याला पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. यानंतर मोहनलालनं हत्येची कबुली दिली. हरिओमनं वडिलांना एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं. हरिओम ही गोष्ट बाहेर सांगेल याची भीती महिलेला होती. हरिओमला संपवा अन्यथी मी जीव देते, अशी धमकी महिलेनं दिली. त्यामुळे मोहनलालनं हरिओमची हत्या केली.
रात्री उशिरा मोहनलालनं हरिओमला झोपतून उठवलं. त्यानं प्रतिकार म्हणू नये यासाठी आधी त्याचे हात कापले. त्यानंतर दोरीनं त्याचा गळा आवळला. मोहनलालचे दोन्ही हात एका कुपनलिकेत टाकले. शुक्रवारी पोलिसांनी दोन्ही हात बाहेर काढले. मोहनलालचे अवैध संबंध असलेली महिला त्याच्याच कुटुंबातील आहे. पोलिसांनी तिलाही अटक केली आहे.