एका गावातील १६५ जणांचं नशीब फळफळलं. सगळे एकाचवेळी कोट्यधीश झाले. सामूहिक लॉटरीमध्ये त्यांनी १२०० कोटी रुपये जिंकले. प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात जवळपास ७ कोटी ५० लाख रुपये आले. लॉटरी लागल्यानं बेल्जियमच्या एंटवर्प प्रांतातील ओलमेन गावात आनंदोत्सव साजरा होत आहे.

डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, ओलमेन गावातील १६५ जणांनी मिळून युरोमिलियन लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. त्यासाठी प्रत्येकानं १ हजार ३०८ रुपये दिले होते. मंगळवारी लकी ड्रॉ काढण्यात आला. ग्रामस्थांनी काढलेल्या तिकिटाचा नंबर विजयी घोषित झाला. त्यामुळे १६५ ग्रामस्थांना १२३ मिलियन पाऊंड्स मिळणार आहेत. भारतीय चलनात ही रक्कम १२०० कोटी रुपयांपेक्षा अधिक होते.
अरे हा तर… लग्नघटिका समीप असताना मंडपवाल्यानं नवऱ्याला ओळखलं; कुटुंब ‘सावधान’ झालं अन्…
लॉटरीचं तिकीट खरेदी करण्यासाठी १६५ ग्रामस्थांनी पैसे काढले होते. सगळ्यांनी सारखीच रक्कम दिली होती. त्यामुळे लॉटरीची रक्कम सगळ्यांमध्ये सारखीच वाटण्यात येईल. प्रत्येकाच्या खात्यात जवळपास साडे सात कोटी रुपये येतील. लॉटरी लागल्यास बक्षिसाची रक्कम समसमान वाटली जाईल, असं ग्रामस्थांनी आधीच ठरवलं होतं. अचानक लागलेली लॉटरी ख्रिसमस गिफ्ट असल्याची प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी दिली.

एखाद्या गटाला अशा प्रकारे लॉटरी लागणं नवं नसल्याचं नॅशनल लॉटरीचे प्रवक्ते जोक वर्मारे यांनी सांगितलं. आतापर्यंत कधीच १६५ जणांच्या गटाला लॉटरी लागलेली नाही. त्यामुळे लॉटरी जिंकणारा हा सगळ्यात मोठा गट ठरला असल्याचं वर्मारे म्हणाले. आम्हाला लॉटरीची घोषणा ५ ते ६ वेळा करावी लागली. कारण आपण इतकी मोठी रक्कम जिंकलो आहोत यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता, अशी माहिती त्यांनी दिली.
पतीसाठी करायची होती चटणी; शेजारच्याकडे टोमॅटो आणायला गेली पत्नी; घरी परतताच आक्रित घडलं
डिझेल संपत आल्यानं महिलेला लॉटरी
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये वास्तव्यास असलेल्या लॉरा किन प्रियकरासोबत ट्रकनं शॉपिंगला गेल्या होत्या. यावेळी ट्रकमधील सिग्नल सुरू झाला. इंधन संपत असल्याची सूचना देणारी लाईट पेटू लागली. यानंतर लॉरा यांनी नॉर्थ कॅरोलियामधील सेव्हन इलेव्हन पेट्रोल पंपावर ट्रक थांबवला. त्यांनी ट्रकमध्ये डिझेल भरलं.

पंपावर डिझेल भरत असताना लॉरा यांनी तिथे लॉटरीचं तिकीट काढलं. यानंतर अवघ्या काही मिनिटांत लॉरा यांना लॉटरी लागली. लॉरा यांनी ८ कोटीपेक्षा अधिक रक्कम जिंकली. लॉटरी लागल्याचं समजताच लॉरा यांना प्रचंड आनंद झाला. आपल्याला लॉटरी लागली आहे, यावर त्यांना बराच वेळ विश्वासच बसला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here