मुंबई: मुंबईतील रुग्णालयातील एका करोना रुग्णाला तब्ब्ल १८ लाख ८० हजार रुपयांचं बिल देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजपचे माजी खासदार यांनी ही माहिती दिली आहे. खासगी रुग्णालयांकडून करोना रुग्णांच्या होणाऱ्या लूटमारीचे अशी अनेक उदाहरणं देत सोमय्या यांनी आरोग्यमंत्री व मुंबई महापालिका आयुक्त यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे.

वाचा:

घटालिया नामक करोना रुग्णावर सध्या वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते अजूनही तेथील आयसीयूमध्ये आहेत. मात्र, आतापर्यंतचं त्यांचं बिल १८ लाखांच्यावर झालं आहे. त्यांच्या मुलांना आपल्याला ही माहिती दिल्याचं सोमय्या यांनी आरोग्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेनं खासगी रुग्णालयातील केवळ खाटांचं भाडं निश्चित केलं आहे. इतर कुठल्याही शुल्कांवर निर्बंध नाहीत. त्यामुळं कोविड मॅनेजमेंट शुल्क, पीपीई शुल्क, कन्सल्टन्सी आणि अन्य शुल्काच्या नावाखाली खासगी रुग्णालये रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळत आहेत. सरकारनंच एक प्रकारे यासाठी रुग्णालयांना खुली सूट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

‘खासगी रुग्णालयाच्या लूटमारीचे बळी ठरलेले घटालिया हे एकमेव रुग्ण नाहीत. मागील आठवड्यात एका रिक्षाचालकाला सव्वा नऊ लाख रुपये, एका छोट्या व्यापाऱ्याला १५ लाख १७ हजार रुपये आणि एका कामगाराला सव्वा नऊ लाखांचं बिल आलं होतं,’ याकडं सोमय्या यांनी लक्ष वेधलं आहे. ‘सरकारनं आतातरी ‘बनवा बनवी’ थांबवून कृती करावी आणि रुग्णांना दिलासा द्यावा,’ अशी मागणी सोमय्या यांनी पत्राद्वारे केली आहे.

आणखी वाचा:

आणखी वाचा:

आणखी वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here