नवी दिल्ली: स्वतःचे घर घेणे आपल्यापैकी बहुतेकांचे स्वप्न असते. पण आजच्या महागाईच्या काळात हे स्वप्न पूर्ण करणे कठीण झाले आहे. एकीकडे महागाई वेगाने वाढत आहे, ज्याचा परिणाम रिअल इस्टेटवरही होत आहे. दुसरीकडे, लोकांचे उत्पन्न घराच्या वाढत्या किमतींशी जुळत नाही. पण, आजच्या काळात घर घेणे अशक्य झाले आहे, असे नाही. बदलत्या काळानुसार, परवडणाऱ्या घरांमुळे लोकांचे घर घेण्याचे स्वप्न साकार होण्यास खूप मदत झाली आहे.

कर्जदारांना ‘जोर का झटका’; PNB सहित दोन खासगी बँकांचे कर्ज महागले, चेक करा नवे व्याजदर
त्यामुळे जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल पण तुमच्या उत्पन्नानुसार एवढे मोठे पाऊल उचलणे योग्य आहे की नाही? अशा प्रश्न पडत असेल तर तुमचा गोंधळ चुटकीसरशी दूर होईल. आज आम्‍ही तुम्‍हाला एका नियमाविषयी सांगणार आहोत, जो तुम्‍ही तुमच्‍या परिस्थितीनुसार लागू करू शकता आणि तुम्‍ही घर विकत घ्यावे की नाही, हे समजून घेण्यासाठी फायदेशीर ठरेल.

गृहकर्जाचे सर्व EMI फेडल्यानंतर हे काम करायला विसरू नका; अन्यथा होईल मोठा खोळंबा

समजून घ्या नियम
हा एक थंब नियम किंवा वित्तविषयक मूलभूत नियम आहे. हा नियम म्हणजे ५-२०-३०-५० आहे. म्हणजेच तुम्ही खरेदी करू पाहत असलेल्या घराची किंमत तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या ५ पट जास्त नसावी. यानंतर, तुमच्या कर्जाचा कालावधी २० वर्षांपेक्षा जास्त नसावा. तुमच्या कर्जाचा ईएमआय तुमच्या मासिक उत्पन्नाच्या ३०% पेक्षा जास्त नसावा आणि शेवटी, तुमच्याकडे असलेल्या सर्व कर्जांची एकूण ईएमआय तुमच्या मासिक आणि वार्षिक उत्पन्नाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावी.

आयुष्यातील पहिलं घर खरेदी करताय, मग या गोष्टी लक्षात ठेवा; येणार नाही कोणतीही अडचण

बजेटचा ५०-३०-२० नियम काय

हा नियम तुमचा पगार ३ भागांमध्ये विभागण्याबद्दल सांगतो. या नियमानुसार तुम्ही तुमच्या मासिक उत्पन्नाच्या (करानंतर) ५० टक्के आवश्यक गोष्टींसाठी, ३० टक्के तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींसाठी आणि २० टक्के बचत किंवा कर्ज परतफेडीसाठी वापरा. जर तुम्ही वरील नियमाप्रमाणे तुमचे पैसे व्यवस्थापित केले तर कोणत्याही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. लक्षात घ्या की केवळ २० टक्के बचतीसाठी लोक या नियमावर टीका करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here