या खेळाडूने आपली करुण कहाणी यावेळी सांगितली. तो म्हणाला की, ” मी भारताचा एक खेळाडू असलो तरी सध्याच्या घडीला मला लोकं ‘ केळेवाला’ म्हणून हाक मारत आहेत. कारण माझ्यावर परिस्थितीच तशी आली आहे त्याला काय करणार. मी सधन कुटुंबातला नाही. करोनामुळे आमच्या कुटुंबियांवर संकट आले आहे. ते संकट निवारण मलाच करावे लागणार आहे. त्यामुळे अर्थाजन करण्यासाठी मी आणि वडिलांनी फळांच्या व्यवसाय सुरु केला आहे.”
दिल्लीतील महिपालपूर येथे भारताचा आंतरराष्ट्रीय धावपटू अली अन्सारी राहत आहे. अलीने आशियाई युवा स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. त्यानंतर अलीकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवण्यात आल्या होत्या. तो भारताचे उज्वल भविष्य आहे, असेही म्हटले गेले होते. पण सध्याच्या घडीला तरी अलीला सराव तर सोडाच पण पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर उतरून फळं विकण्याची वेळ आली आहे.
हा खेळाडू पुढे म्हणाला की, ” करोनामुळे सर्वांचेच नुकसान झाले आहे. काही जणांवर वाईट परिस्थिती आली आहे. या परिस्थितीचा सामना आपण करायला हवा. कारण त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे या परिस्थितीमध्ये आपणच खंबीरपणे उभे राहायला हवे. सध्याच्या घडीला काही देशांमध्ये इनडोअर सरावाला सुरुवात झाली आहे. पण त्यामुळे करोनाचा धोका जास्त वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला सराव करणे दूर आहे. या घडीला माझ्यापुढे कुटुंबियांचा उदरनिर्वाह कसा चालवता येईल, हे सर्वात महत्वाचे आहे. त्यासाठी मी सध्याच्या घडीला प्रयत्नशील आहे.”
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times