सोमनाथ बळीराम शिंदे (वय २५) असे मृत पावलेल्या ट्रेकर्सचे नाव असून काल रविवारी ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे ट्रेकिंग करणाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ हा त्याच्या नऊ मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी तैल-बैल गडावर गेला होता. सोमनाथ हा गडावर पुढे जाऊन रोप-वे चे बांधण्याचे काम करत होता. हे काम करत असताना त्याचे मित्र बांधलेल्या रोप-वेच्या साहाय्याने गडाची चढाई करत होते. चढाई करत असताना बांधलेला रोप-वे अचानक तुटला. त्यामुळे सोमनाथला सावरायला वेळ मिळाला नाही. तो खाली २०० फूट दरीत कोसळला.
या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी त्याचा मृत्यू डोळ्यासमोर पाहिला. त्यामुळे ते पुरते घाबरून गेले होते. सोमनाथ हा पुण्यातील कात्रज परिसरातील रहिवासी होता. त्याला आधीपासून ट्रेकिंगची आवड होती. सोमनाथचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ट्रेकिंगला जाताना काय काळजी घ्यावी
ट्रेकर्सनी ट्रेकिंगला जाताना संपूर्ण माहिती घेऊन, प्रशिक्षण घेऊनच जावे जेणे करून अशा दुर्घटना घडणार नाहीत. योग्य प्रशिक्षण, अनुभवी ट्रेकर्सचे मार्गदर्शन, योग्य ती खबरदारी घेऊन ट्रेकींग करावे जेणेकरून मोठी दुर्घटना टळण्यास मदत होईल.