मुंबई: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी ही कामाची बातमी आहे. वर्ष २०२२ गुंतवणूकदारांसाठी अनिश्चिततेचे राहिले असताना यंदा बाजाराने नवीन शिखरही गाठले. यादरम्यान पेटीएम, पॉलिसी बाजार, झोमॅटो, ग्लॅन्ड फार्मा आणि नायका यांसारख्या अनेक कंपन्यांचे शेअर्स गेल्या वर्षभरात निम्म्या किंमतीवर घसरले आहेत. पेटीएम कंपनीला सर्वाधिक तोटा झाला असून शेअर्समध्ये ६६ टक्क्यांहून अधिक घसरला नोंदवली गेली, तर पॉलिसी बाजारचे शेअर्स सुमारे ६० टक्क्यांनी घसरले. तसेच झोमॅटोने ५६ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली.

शेअर्सची कमाल, गुंतवणूकदार मालामाल! एका वर्षात या समभागांनी पकडला रॉकेट स्पीड, दिला हजार टक्क्यांचा रिटर्न
लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपन्यांमध्ये पिरामल एंटरप्रायझेस आपल्या गुंतवणूकदारांसाठी डोकेदुखी ठरले. स्टॉक २,६३५.७० रुपयांवरून ८५९.१० रुपयांवर घसरला आहे. तर पेटीएम रु. १,५९३.९५ वरून ५३९ रुपयांवर घसरला आहे. तसलेच ब्राईटकॉम समूहाचे शेअर्स गुंतवणूकदारांचा पुढील रस्ता बिकट आहे. शेअर ९१.८३ रुपयांवरून ३३.२० रुपयांपर्यंत खाली घसरला आहे.

IPO असावा तर असा! गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी जोरदार फायदा; शेअरमागे १७ टक्के नफा
शेअर बाजारात यंदा सर्वाधिक घसरणाऱ्या शेअर्समध्ये पॉलिसी बाजारचा देखील समावेश आहे. पॉलिसी बाजारचे शेअर्स ११३१.२५ रुपयांवरून ४६१.८५ रुपयांवर घसरले आहेत. तन्ला सोल्युशन्सची किंमतही रु. १,८४६.९५ वरून ५८ टक्क्यांनी घसरून रु. ७६९.८५ वर आली आहे. झोमॅटोचा शेअर देखील ६४.१० रुपयांवर घसरला आहे, तर लक्स इंडिया आता प्रति शेअर २,१६६ रुपयांवरून १६९३.४५ रुपयांवर आला आहे. नायका देखील रु. ३६०.५७ वरून रु. १७४.१० वर घसरला आहे.

गुंतवणूकदारांनो, इकडे लक्ष द्या! सुला वाइनयार्ड्स IPO ची इश्यू प्राईज ठरली, जाणून घ्या महत्त्वाचा तपशील
गुंतवणूकदारांनी काय करावे?
कंपनीच्या शेअर्समधील घसरणीच्या काळात गुंतवणूकदारांनी काय करावं असा प्रश्न उपस्थित होतो. नेमके ग्लोबलने पिरामलवर ‘बाय’ रेटिंग देत १,२०० रुपयांचे टार्गेट प्राईस (लक्ष्य) ठेवले आहे. त्याच वेळी, ७ पैकी ६ विश्लेषक देखील या स्टॉकमध्ये गुंतवणूक लावण्याचा सल्ला देत आहेत. त्यांनतर पॉलिसी बाजारबद्दल बोलायचे तर ११ पैकी १० विश्लेषकांनी खरेदी सल्ला दिला. तसेच झोमॅटोबाबत २३ पैकी १७ विश्लेषकांना ‘बाय’ रेटिंग देईल आहे, चार विश्लेषकांनी होल्ड रेटिंग दिले आणि उर्वरितने झोमॅटोवर विक्री (सेल) कौल दिला.

(नोट: येथे केवळ स्टॉकच्या कामगिरीबद्दल माहिती दिली आहे, तो गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणे जोखमीच्या अधीन असून गुंतवणूक करण्यापूर्वी, तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here