मुंबई: तुम्हाला आयपीओ मध्ये गुंतवणूक करायची असेल तर पुढच्या आठवड्यात चांगली संधी आहे. पुढील आठवड्यात तीन कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. त्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही नफा कमवू शकता. ऑटोमोबाईल डीलरशिप साखळी असलेली कंपनी लँडमार्क कार्स लिमिटेड, देशातील सर्वात मोठी वाइन निर्माता सुला विनयार्ड्स लिमिटेड आणि अबन्स होल्डिंग्सचा आयपीओ पुढील आठवड्यात गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे.

सुला विनयार्ड्सचा आयपीओ
पुढील सोमवारपासून म्हणजे १२ डिसेंबर २०२२ पासून सुला विनयार्ड्स लिमिटेडचा आयपीओ खुला होणार आहे. इच्छूक गुंतवणूकदार या आयपीओत १४ डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकतात आहे. आयपीओसाठी ३४० ते ३५७ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे.

शेअर्सची कमाल, गुंतवणूकदार मालामाल! एका वर्षात या समभागांनी पकडला रॉकेट स्पीड, दिला हजार टक्क्यांचा रिटर्न
मुंबईस्थित वाइनमेकर सुला विनयार्ड्सचे एमडी राजीव सामंत यांच्या मते, गुंतवणूकदारांना किमान ४२ शेअर्ससाठी बोली लावावी लागेल. सुला विनयार्ड्सने १९९६ मध्ये पहिली द्राक्ष बाग उघडली. तर वर्ष २००० मध्ये कंपनीने प्रथमच द्राक्षांच्या विविध जातींपासून वाइन बनवण्यास सुरुवात केली. सध्या कंपनी १३ वेगवेगळ्या ब्रँड्सच्या अंतर्गत ५६ प्रकारच्या वाइनचे उत्पादन करते. कंपनीच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये एकूण ६ उत्पादन सुविधा आहेत.

अबन्स होल्डिंग्जचा आयपीओ
अबन्स समुहाला आर्थिक सेवा पुरवणाऱ्या अबन्स होल्डिंग्जचा आयपीओ १२ डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला तीन दिवस मिळतील. हा आयपीओ १५ डिसेंबरला बंद होईल. आयपीओसाठी २५६-२७० रुपये प्रति शेअरचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.

गुंतवणूकदारांनो, इकडे लक्ष द्या! सुला वाइनयार्ड्स IPO ची इश्यू प्राईज ठरली, जाणून घ्या महत्त्वाचा तपशील
या आयपीओ अंतर्गत ३८ लाख शेअर्स जारी केले जातील. कंपनीचा व्यवसाय यूके, सिंगापूर, यूएई, चीन, मॉरिशस आणि भारत या सहा देशांमध्ये पसरलेला आहे. कंपनी कॉर्पोरेट, संस्थात्मक आणि उच्च निव्वळ मूल्य असलेल्या वैयक्तिक ग्राहकांना इक्विटी, कमॅडिटी आणि परकीय चलन, खाजगी ग्राहक स्टॉक ब्रोकिंग, डिपॉझिटरी सेवा, मालमत्ता व्यवस्थापन सेवा, गुंतवणूक सल्लागार सेवा आणि संपत्ती व्यवस्थापन सेवांमध्ये जागतिक संस्थात्मक व्यापार प्रदान करते.

IPO असावा तर असा! गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी जोरदार फायदा; शेअरमागे १७ टक्के नफा
लँडमार्क कार्सचा आयपीओ मंगळवारी उघडणार
ऑटोमोबाईल डीलरशिप चेन लँडमार्क कार्स लिमिटेडने आयपीओसाठी प्रति शेअर ४८१ ते ५०६ रुपये किंमत बँड निश्चित केला आहे. आयपीओ १३ डिसेंबरला उघडेल आणि १५ डिसेंबरला बंद होईल. गुंतवणूकदार किमान २९ शेअर्स आणि त्यानंतर २९ शेअर्सच्या लॉटमध्ये बोली लावू शकतात.

या आयपीओ अंतर्गत १५० कोटी रुपयांचे अर्स जारी केले जातील. त्याच वेळी ४०२ कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील. कंपनीचे शेअर्स २३ डिसेंबर २०२२ रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे. लँडमार्क समूह मर्सिडीज-बेंझ, होंडा, जीप, फोक्सवॅगन आणि रेनॉल्टच्या डीलरशिपसह भारतात प्रीमियम ऑटोमोटिव्ह रिटेल व्यवसाय चालवतो. हे अशोक लेलँडचा व्यावसायिक वाहन किरकोळ व्यवसाय देखील हाताळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here