मुंबईः महाराष्ट्रात करोनाचा विळखा अधिक घट्ट होत असाताना आणखी एका नेत्याला करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार फौजिया खान यांना करोनाची लागण झाली आहे. फौजिया खान या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. ( tested Corona Positive)

फौजिया खान यांची अँटीजन चाचणी झाल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांनी दिली आहे. तसंच, राष्ट्रवादीचे परभणी जिल्हाध्यक्ष आणि आमदार बाबाजानी दुर्रानी यांनाही करोनाची बाधा झाली आहे. बाबाजानी दुर्रानी यांची स्वॅब पॉझिटिव्ह आली आहे.

फौजिया खान यांचा जनसंपर्क फार मोठा असल्यानं त्यांच्या संपर्कातही काही व्यक्ती आल्या असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. करोना संसर्गाच्या काळात त्याही परभणीतील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मैदानात उतरल्या होत्या. फौजिया खान या माजी मंत्रीदेखील आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी शालेय शिक्षण, महिला आणि बाल कल्याण, राज्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली होती.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारमधील नेत्यांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये मंत्री जितेंद्र आव्हाड , अशोक चव्हाण आणि धनंजय मुंडे करोनावर यशस्वी मात करुन परतल्यानंतर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख व शिवसेनेचे आमदार वैभव परब यांनाही करोनानं गाठलं आहे. लोकप्रतिनिधीमध्ये करोनाचा वाढता संसर्ग पाहता आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here