मुंबई: युनिपार्ट्स इंडिया, अभियांत्रिकी कंपनी आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाली आहे. कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. कंपनीच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतू बाजारात सूचिबद्ध होताना कंपनीच्या शेअर्सची कमकुवत सुरूवात झाली. कंपनीच्या शेअर्सचा ५७५ रुपयांपासून व्यवहार सुरू झाला आणि आयपीओची किंमत प्रति शेअर ५७७ रुपये होती. म्हणजेच, प्रत्येक शेअरवर गुंतवणूकदारांचे २ रुपये (०.३५ टक्के) नुकसान झाले आहे.

Paytm Buyback Offer: पेटीएमचा शेअर बायबॅक प्लॅन अडकून राहणार? गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी आली समोर
बाजारात विक्रीच्या दबावाचा परिणाम
आज शेअर बाजारात सुरूवातीच्या काही वेळात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. सेन्सेक्स जवळपास 500 अंकांनी घसरला तर निफ्टी १८,३५० च्या आसपास व्यवहार करीत असताना, युनिपार्ट्स इंडियाचा शेअर बाजारात सूचिबद्ध झाला. बाजारात प्रत्येक क्षेत्रात दबाव दिसून येत असल्याचा परिणाम युनिपार्ट्स इंडियाच्या शेअर्सवरही झाला.

पैसे तयार ठेवा… चालू आठवड्यात येणार ३ नवे IPO, पहिल्याच गुंतवणुकीवर मिळू शकतो मोठा नफा
शेअर्समध्ये गुंतवणुकीबाबत रणनिती
स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे संशोधन प्रमुख संतोष मीना यांच्या मते, शेअर्सची ट्रेडिंग ५७५ रुपयांपासून सुरू झाली. पण या इश्यूला संस्थात्मक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजूंनी गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. कंपनीचे मुख्य व्यवसाय क्षेत्र कृषी, बांधकाम, वनीकरण आणि आफ्टर मार्केट आहेत. कंपनीचे व्यवसायाचे मॉडेल जागतिक असून प्रमुख ग्राहकांशी दीर्घकालीन संबंध आहेत. कंपनीच्या उत्पन्नात आणि नफ्यात सतत वाढ होत आहे. मार्जिनमध्ये देखील सुधारणा होत आहे. त्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे दिसून येते. सूचिबद्धतेनंतर शेअर्समध्ये गुंतवणूक सुरू ठेवल्यास तुमचा स्टॉप लॉस ५३५ वर ठेवा.

काय सांगताय? फक्त अर्ध्या किमतीत उपलब्ध आहेत हे ५ शेअर्स, खरेदी करायचे की नाही, गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ
आयपीओ किती पट भरला
युनिपार्ट्स इंडियाच्या आयपीओला गुंतवणुकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आयपीओ २५.३२ पट भरला गेला. आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) ५० टक्के शेअर्स आरक्षित होते. ही श्रेणी ६७.१४ पट भरली गेली. १५ टक्के एनआयआयसाठी राखीव असलेली श्रेणी १७.८६ पट तर ३५ टक्के शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव होते. ही श्रेणी ४.६३ पट भरली गेली.

कंपनी काय करते
युनिपार्ट्स इंडिया ही अभियांत्रिकी क्षेत्रातील जागतिक उत्पादक आहे. कंपनीचे जगभरातील २५ देशांमध्ये अस्तित्व आहे. युनिपार्ट्स हे कृषी आणि बांधकाम, वनीकरण आणि खाणकाम आदी उत्पादनांच्या प्रमुख पुरवठादारांपैकी एक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here