भूदल, नौदल आणि हवाई दलात काही सैनिकांना खडतर प्रशिक्षण दिलं जाते. जेणेकरुन स्पेशल मिशनवर जाण्यासाठी ते सक्षम असतील. वेगवेगळ्या मिशनसाठी तयार करणाऱ्या सैनिकांना खडतर प्रशिक्षण दिलं जाते. या प्रशिक्षणात अधिकारी पास झाल्यास त्यांना नौदलात मार्कोस म्हणून नियुक्त केलं जाते. आत्तापर्यंत मार्कोस म्हणून फक्त पुरुष अधिकारी कार्यरत होते. मात्र, आता महिला आधिकारीही मार्कोस म्हणून देशसेवा करु शकणार आहेत. भारतीय सैन्य दलाने ही ऐतिहासिक घोषणा आहे. पुढील वर्षापासून महिला अधिकाऱ्यांना मार्कोस कमांडोचे ट्रेनिंग देण्यात येणार आहे.

नेव्हीची स्पेशल फोर्स युनिट

मार्कोस कंमाडो फोर्स ही इंडियन नेव्हीची एक स्पेशल फोर्स युनिट आहे. १९८७मध्ये फोर्स तयार करण्यात आली होती. सुरुवातीला मरीन कमांडो फोर्स म्हणजेच एमसीएफच्या नावाने ओळखले जात होते. मार्कोस कमांडोंची जगातील सर्वात शक्तीशाली १० फोर्समध्ये होते. मार्कोस कमांडोंना जमीन, पाणी, हवा या तिन्ही ठिकाणाचा युद्धाभ्यासाचे प्रशिक्षण दिले जाते. पॅरा जंपिगपासून सी डायव्हिंगपर्यंत सगळ्याप्रकराचे ऑपरेशन मार्कोस कमांडो हाताळू शकतात. मार्कोसला देण्यात येणारे प्रशिक्षण हे अमेरिकन नेव्हीसीस आणि ब्रिटिश स्पेशल फोर्स एसएसएसप्रमाणेच खडतर असते.

कोण असतात उमेदवार

मार्कोस स्पेशल फोर्ससाठी निवडण्यात आलेले उमेदवार हे नौदलातील सर्वात हुशार आणि तंदुरुस्त अधिकारी असताता. मार्कोससाठी २० वर्ष वयोगटाची अट असते. तर, प्रशिक्षणहे इंडियन आर्मीच्या पॅरा कमांडोबरबरच ट्रेनिंग स्कुलमध्ये देण्यात येते. मार्कोस कमांडोंना हाय अल्टीटय़ूट कमांडोची ट्रेनिंग अरुणाचल प्रदेशच्या तवांगमधील पर्वत घाट ट्रेनिंग स्कूल, राजस्थानमधील डेजर्ट वॉरफेअर स्कूल, सोनमर्गमधील हाय अल्टीटय़ूट वॉरफेअर स्कूल आणि मिझोराममधील घुसखोरी प्रबंधक आणि जंगल वॉरफेअर स्कूल या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते.

ओळख गुप्त ठेवण्यात येते

मार्कोस कमांडोची खरी ओळख गुप्त ठेवण्यात येते. कुटुंबीयांनीही ते मार्कोस कमांडो असल्याची माहिती देता येत नाही. ऑपरेशनदरम्यान मार्कोस कधीही आपला चेहरा उघड करत नाहीत. आत्तापर्यंत मार्कोस कमांडो फोर्समध्ये २००० व्यक्ती आहेत अशी प्राथमिक माहिती आहे. पण याबाबतचा आकडा हा गुप्त ठेवण्यात येतो. मार्कोस हे जगातील काही सर्वोत्कृष्ट शस्त्रे चालवण्यामध्ये तरबेज असतात. रात्री ६० किलो वजन घेऊन रोज २० किलोमीटर धावण्याचं ट्रेनिंग दिलं जातं. त्यांना आठवड्याला ६० किलो वजन घेऊन १२० किलोमीटर चालवले देखील जाते. मार्कोस पाण्यात सहजपणे पोहोण्यात पटाईत असतात. त्यांचे दोन्ही-हात पाय बांधलेले असतानादेखील ते पाण्यात पोहू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here