तरुणीच्या तक्रारीच्या आधारे सायबर पोलीस स्टेशन येथे अप क्र ३६ / २०२२ भादवि कलम ३५४ अ, ३५४ ड, आयटी अॅक्ट कलम ६६ इ, ६७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून हा गुन्हा करणाऱ्या सायबर भामट्याला पोलिसांनी ट्रेस केले. गुन्हा दाखल होताच सायबर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपीबाबत तांत्रिक माहिती प्राप्त केली.
आरोपी हा सायबर गुन्हेगार असल्याने आणि तो बनावट इन्टाग्राम आयडीचा वापर करत असल्याने त्याचा शोध घेणे कठीण जात होते. त्यामुळे सदर तरुणीच्या माध्यमातून इन्टाग्राम आयडी धारकाशी चॅटिंग करून त्यास अमरावती येथे बोलावून सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार आरोपी तरुण हा अमरावती येथे येत असल्याने सायबर पोलीसांनी राजापेठ येथे सापळा रचून संशयित आरोपी प्रणय सुधाकर घुबडे, (वय २१, व्यवसाय शिक्षण, रा. गांधीवार्ड, बल्लारपूर जि. चंद्रपूर) यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, ‘पोलिसांनी दाखवलेल्य सतर्कतेमुळे घाबरलेल्या मुलीला दिलासा मिळाला. सोशल मीडियाचा वापर करताना आपण कशा पद्धतीचे फोटो, व्हिडिओ पाठवत आहोत, याबाबत सावधगिरी बाळगली पाहीजे. विशेषत: कॉलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सोशल मीडियावर खाजगी चॅटिंग करताना खाजगी क्षणांचे फोटो आि व्हिडीओ पाठवण्याची चूक करू नये. कारण नंतर सदर फोटो व व्हिडिओंचा वापर करून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे याबाबत सावध राहावं,’ असं आवाहन पोलीस निरीक्षक सीमा दाताडकर यांनी केलं आहे.