बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरूत एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्री उशिरा रस्त्यावरून चालत असलेल्या जोडप्याला पोलिसांनी रोखलं. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांच्याकडे ओळखपत्रांची मागणी केली. यानंतर पोलिसांनी दोघांचे फोन जप्त केले. त्यांची कसून चौकशी सुरू केली. पोलिसांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून जोडप्याकडून लाच घेतली. घडलेल्या प्रकाराची माहिती पतीनं सोशल मीडियावर शेअर केली आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांना निलंबित करण्यात आलं.

कार्तिक पत्री असं पीडित पतीचं नाव आहे. त्यानं ट्विटरवर ही घटना सविस्तर सांगितली. एका पाठोपाठ एक १५ ट्विट्स करत त्यानं घडलेला प्रकार विस्तारानं मांडला. मी बंगळुरूत वास्तव्यास आहे. रात्री साडे बाराच्या सुमारास पत्नीसोबत मित्राच्या घरातून वाढदिवसाचा केक कापून परतत होतो. आम्ही घराजवळ पोहोचत असताना पोलिसांची व्हॅन तिथे आली. दोन पोलीस बाहेर आले आणि त्यांनी आम्हाला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. ओळखपत्रांची मागणी केली. आम्ही मोबाईलवर आधार कार्ड दाखवले. यानंतर पोलिसांनी ओळखपत्र जप्त केली. यानंतर आणखी चौकशी सुरू केली, असा घटनाक्रम पत्री यांनी सांगितला.
नवरा घराबाहेर जाताच प्रियकर यायचा; महिलेनं आधी सासऱ्याला संपवलं, मग पतीवर हल्ला घडवला, पण…
दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी दाम्पत्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यानंतर दंड आकारण्याची भाषा केली. दंड कशासाठी असा प्रश्न दोघांनी केली. त्यावर रात्री ११ नंतर रस्त्यावर फिरण्याची परवानगी नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. पावती फाडायची नसल्यास ३ हजार रुपये द्या, अशी मागणी पोलिसांनी केली. अखेर विषय १ रुपयांपर्यंत आला. पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या क्यूआर कोडच्या माध्यमातून १ हजार रुपयांची लाच घेतली.
मिशन MGM! कॅम्पसमध्ये फिरणारी, फ्रेशर्सशी मैत्री करणारी ‘ती’ निघाली पोलीसवाली; छडा लावला
पीडित व्यक्तीनं संपूर्ण घटनाक्रम ट्विटरवर शेअर केल्यानंतर पोलिसांनी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं. या प्रकरणी योग्य कारवाई करण्याचं आश्वासन बंगळुरू इशान्य विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनुप शेट्टी यांनी दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here