तेलंगणात वास्तव्यास असलेल्या एका तरुणाचं अनेक महिन्यांपासूनचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. तरुणानं केटीएमची स्पोर्ट्स बाईक खरेदी केली. बाईक खरेदीसाठी व्यंकटेश मित्रांसोबत केटीएमच्या शोरूमला पोहोचला. विशेष म्हणजे मिनी ट्रक घेऊन व्यंकटेश आणि त्याच्या मित्रांनी शोरुम गाठलं. पावणे तीन लाखांपेक्षा अधिक किमतीची बाईक त्यांनी १ रुपयांची नाणी देऊन खरेदी केली.

बाईक खरेदी करण्यासाठी आल्याचं व्यंकटेशनं शोरुममधील कर्मचाऱ्यांना सांगितलं. १ रुपयांच्या नाण्यांच्या रुपात पैसे भरणार असल्याचं व्यंकटेश म्हणाले. सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी थोडी काचकूच केली. मात्र व्यंकटेशनं ड्रीम बाईक खरेदीसाठी केलेली धडपड ऐकल्यावर कर्मचाऱ्यांचा पवित्रा बदलला. व्यंकटेशनं मिनी ट्रकमधून आणलेली नाणी मोजण्यासाठी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस लागला. कर्मचाऱ्यांनी २.८५ लाख रुपये मोजून घेतले. रक्कम बरोबर असल्याचं व्यंकटेशला कळवलं. त्यानंतर व्यंकटेश आणि त्याचे मित्र नवीकोरी बाईक घेऊन घरी गेले. व्यंकटेशनं बाईक खरेदी करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचं अनेकांनी कौतुक केलं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.