म. टा. प्रतिनिधी । नगर

‘नगर जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लॉकडाऊन करण्याची आवश्यकता आहे. कारण सध्या लॉकडाऊन हा एकमेव पर्याय दिसत आहे. परंतु केवळ पालकमंत्र्यांच्या अट्टाहासामुळे जिल्ह्यात लॉकडाउन होत नसल्याची माहिती मिळत आहे’, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री प्रा. यांनी पालकमंत्री यांचे नाव न घेता केला. (BJP Leader criticises )

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधत टीका केली. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजी कर्डिले, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आदी उपस्थित होते.

वाचा:

‘सध्या करोनाचा प्रादुर्भाव नगर जिल्ह्यात वाढत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी सदैव सतर्क राहून जिल्ह्यातील जनतेला दिलासा देण्याचे काम करणे गरजेचे आहे. प्रशासनाला सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत. पण येथे कधीतरी पालकमंत्री येतात. उलट करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पालकमंत्र्यांनी २४ तास उपलब्ध राहिले पाहिजे. जिल्ह्यावर लक्ष दिले पाहिजे. जिल्ह्यातील जनतेला वाऱ्यावर सोडता कामा नये. प्रत्यक्षात त्यांचे जिल्ह्यात दुर्लक्ष आहे. राज्यात सरकार आहे. जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. या पार्श्वभूमीवर ज्या अडचणी येतील, त्या सोडविण्यासाठी प्रशासनाला लोकशाही मार्गाने योग्य निर्देश देणे गरजेचे आहे . परंतु येथे त्याचा अभाव दिसत आहे,’ असेही ते म्हणाले.

वाचा:

ठोस निर्णयाचा अभाव दिसतो!

नगर जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लॉकडाऊन करण्याची आवश्यकता आहे. कारण सध्या लॉकडाऊन हा एकमेव पर्याय दिसत आहे. परंतु केवळ पालकमंत्र्यांच्या अट्टाहासामुळे जिल्ह्यात लॉकडाउन होत नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र लॉकडाउन केले पाहिजे. जनता देखील प्रशासनाला सहकार्य करते. पण येथे निर्णय घेण्याचा अभाव असून ते पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे झाले आहे, असे ते म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here