पालघर: मुंबईपासून जवळच असलेल्या पालघरमधील बोईसरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेपत्ता असलेल्या २१ वर्षीय विवाहित झाल्याचं दीड वर्षानं उघडकीस आलं आहे. सासरच्या लोकांनी तिची हत्या केल्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवला होता. या महिलेचा सांगाडा दीड वर्षांनी पोलिसांच्या हाती लागला आहे.

बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश नगर परिसरातील ही घटना आहे. सासू, सासरे, पती आणि नणंदेवर या महिलेच्या हत्येचा आरोप आहे. फेब्रुवारी २०१९मध्ये या महिलेची हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकून बाथरुममध्ये लपवून ठेवला. त्यानंतर ते कुटुंब बिहारला गेले. घरमालक भाडे घेण्यासाठी घरी गेल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. घराला कुलूप होते. ते तोडून घरात गेले असता, दुर्गंधी येत होती. त्यानंतर पोलिसांना बोलावलं. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर त्यांनी बाथरुममधून ड्रम बाहेर काढला. तो उघडला असता, त्यात सांगाडा सापडला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी मृत महिलेची सासू, सासरा, पती आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बोईसरच्या गणेश नगरमध्ये राहणारी बुलबुल झा (वय २१) ही पती दीपक झा, सासू बच्चू देवी झा, सासरा पवन झा आणि नणंद नीतू यांच्यासोबत लोकेश मीठालाल जैन या व्यक्तीच्या घरात भाड्याने राहत होती. दीपक आणि पवन हे खासगी कंपनीत नोकरी करत होते. लग्नानंतर सासरचे लोक बुलबुलला हुंड्यासाठी मारहाण करायचे. २०१७मध्ये त्यांनी एकदा बुलबुलला पेटवून दिले होते. तिने या चौघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. काही दिवस हे सर्व जण तुरुंगात होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा बुलबुलला त्रास देण्यास सुरुवात केली. तक्रार मागे घेण्यासाठी तिला मारहाण करत होते. मात्र, तिनं तक्रार मागे घेतली नाही.

काही दिवसांनंतर संपूर्ण कुटुंब घराला कुलूप लावून बिहारला गेले. घरमालक जैन यांना ते ऑनलाइन पैसे पाठवत होते. लॉकडाउनच्या काळात तीन महिने त्यांनी जैन यांना पैसे पाठवले नाहीत. त्यांनी बुलबुलच्या फोनवर संपर्क साधला. तर तिचा मोबाइल बंद येत होता. रविवारी जैन हे भाडे घेण्यासाठी गणेशनगरला गेले. दरवाजा बंद होता. आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की, घर वर्षभरापासून बंद आहे. जैन यांनी दरवाजा तोडला तेव्हा आतमधून दुर्गंधी येत होती. त्यांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोलीस पोहोचले. त्यांनी बाथरुममधील ड्रम बाहेर काढला. त्यात सांगाडा होता. बुलबुलची हत्या करून चौघेही बिहारला पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे. चौघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचं एक पथक त्यांना अटक करण्यासाठी बिहारला रवाना झाले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here