अल्मोडा : उत्तराखंडमधील अल्मोडा इथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे मुलीच्या लग्नात वडिलांचा डान्स फ्लोअरवर पडून मृत्यू झाला. लग्नाचा आनंद काही क्षणात शोकात बदलला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दुसरीकडे वधूच्या नातेवाईकांनी हल्दवणी इथे जाऊन शोकाकूल वातावरणात विवाह पार पाडला. यावेळी वधूच्या मामाकडून कन्यादान करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, हल्दवानी इथे मीज हॉलमध्ये रविवारी एका मुलीचे लग्न ठरले होते. विवाह सोहळा पार पाडण्यासाठी वधूपक्षातील लोकांना हल्दवणी इथे जावे लागले. याआधी मुलीच्या मेहेंदी, हळदीसह सर्व विधी तिच्या अल्मोडा येथील घरी केले जात होते. विधी दरम्यान लोक रात्री उशिरा नाचत होते. दरम्यान, वधूच्या वडिलांनीही जोरदार नृत्य केले.

Weather Alert : राज्यावर पुढचे ४८ तास आस्मानी संकट, पुण्यासह या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
डॉक्टर म्हणाले – हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

दरम्यान, वधूचे वडील नाचत असताना डान्स फ्लोअरवर पडले. घाईघाईत त्याला बेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे विवाहितेच्या घरात शोककळा पसरली. मुलीचे हात पिवळे होण्याच्या काही तास आधी वडिलांचा मृत्यू झाला. वधूच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना, ३१ मार्चपर्यंत ‘या’ रेल्वेच्या फेऱ्या रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here