नवी दिल्ली: इंग्लंडविरुद्ध मुल्तान येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा २६ धावांनी पराभव झाला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंड संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या पराभवासह पाकिस्तान क्रिकेट संघाला एक मोठा झटका बसला आहे.

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणारा पाकचा संघ आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या सत्राच्या जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत राहण्यासाठी पाकिस्तानला दुसरी कसोटीत विजय मिळवणे गरजेचे होते. इंग्लंडच्या संघाने सलग दोन मॅच जिंकल्या असल्या तरी ते या स्पर्धेतून आधीच बाहेर झालेत.

वाचा- जो रुटने केला क्रिकेटमधील महाविक्रम; विराट-रोहित मैल दूर, फक्त ४ विकेटने हुकला

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर असून त्यांनी १२ पैकी ८ कसोटीत विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयाची टक्केवारी ७५ टक्के इतकी आहे. तर ६० टक्क्यांसह दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकाचा संघ ५३.३३ टक्क्यांसह तिसऱ्या तर टीम इंडिया चौथ्या स्थानावर आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १२ पैकी ६ मॅच जिंकल्या आहेत. ४ कसोटीत भारताचा पराभव तर २ कसोटी ड्रॉ झाल्या आहेत. भारताच्या विजयाची टक्केवारी ५२.०८ इतकी आहे. टीम इंडियानंतर इंग्लंड आणि त्यानंतर पाकिस्तानचा क्रमांक लागतो.

वाचा- स्मृती मंधानाने इतिहास घडवला; असा विक्रम पुरुषांच्या क्रिकेटमध्ये एकालाही जमला नाही

अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी काय करावे लागले भारताला

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला पुढील ६ पैकी ५ कसोटीत विजय मिळवावा लागले. या महिन्यात भारताची लढत बांगलादेशविरुद्ध होणार आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका उद्या म्हणजे १४ डिसेंबरपासून सुरू होईल. त्यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. जर भारताने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील २ मॅच जिंकल्या तर ते लंकेला मागे टाकून तिसऱ्या स्थानावर पोहोचतील. अशा स्थितीत त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील फक्त ३ कसोटी जिंकाव्या लागतील. असे झाले तर टीम इंडिया टॉप २ मध्ये राहिल. गेल्या वेळी भारत टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. पण फायनलमध्ये न्यूझीलंडने त्यांचा पराभव केला.

वाचा-महिला संघाने करून दाखवले,आता पुरुषांची वेळ

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतक्ता (wtc points table)


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here