मंगळवारी, फ्युचर्स मार्केटमध्ये २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव कालच्या बंद किमतीपासून सकाळी ९.१० वाजेपर्यंत ५८ रुपयांनी वाढून ५४,१९० रुपये प्रति १० ग्रॅम होता. तर आज सोन्याचा भाव ५४,१३२ रुपयांवर उघडला. यानंतर पुन्हा एकदा एकदा किंमत ५४,१९७ रुपयांवर पोहोचली तर काही काळानंतर दर ५४,१९० रुपयांपर्यंत घसरले.
दुसरीकडे, आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) चांदी देखील हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहे. कालच्या बंद भावावरून आज चांदीचा दर ३६६ रुपयांनी वाढून ६८,१५२ रुपये प्रति किलो झाला. तर चांदीचा दर आज ६८,०८५रुपयांवर उघडला आहे. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात चांदीचा भाव २५८ रुपयांनी घसरून ६७,७८० रुपयांवर बंद झाला.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने लाल चिन्हात तर चांदी वाढीसह व्यवहार करत आहे. कालच्या बंद किमतीच्या तुलनेत मंगळवारी सोन्याची स्पॉट किंमत ०.६१ टक्क्यांनी घसरून १,७८४.०५ डॉलर प्रति औंस झाली. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी आज हिरव्या रंगात व्यवहार करत आहे. चांदीचा दर ०.१९ टक्क्यांनी वाढला आणि २३.३९ डॉलर प्रति औंस इतका वाढला. विशेष म्हणजे गेल्या एका महिन्यात सोन्याच्या भावात १.५६ टक्क्यांनी वाढ तर चांदीचा दरही ३० दिवसांत ७.०६ टक्क्यांनी वाढला आहे.
भारतीय सराफा बाजाराची स्थिती
सोमवारी, भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात संमिश्र कल दिसून आला. सोने घसरले तर चांदी तेजीसह बंद झाली. १० ग्रॅम सोने ५४,४६१ रुपयांनी स्वस्त झाले. तर एक किलो चांदीचा दर वाढला आणि ६८,५०३ रुपयांवर पोहोचला. तसेच सोमवारी सोन्याचा भाव १०९ रुपयांनी घसरून ५४,४६१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला, जो मागील ट्रेडिंग सत्रात ५४,५७० रुपये प्रति १० ग्रॅम होता. याशिवाय सोन्याच्या विपरीत चांदी ९३४ रुपयांच्या वाढीसह ६८,५०३ रुपये प्रति किलोवर बंद झाली.