तेजीचे कारण काय?
रिझव्र्ह बँकेने येस बँकेला सुमारे ८,८९८ कोटी रुपयांचे आपला हिस्सा दोन यूएस प्रायव्हेट इक्विटी फर्म – कार्लाइल ग्रुप आणि अॅडव्हेंट इंटरनॅशनल यांना विकण्यासाठी सशर्त मंजुरी दिली. या बातमीनंतर येस बँकेच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून येस बँकेचे शेअर्स तेजीच्या मार्गावर परतत आहेत आणि आजही तेजीत राहण्याची अपेक्षा आहे. गेल्या तीन दिवसांत शेअर्स २२ टक्क्यांनी वधारले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून बँकांचे शेअर्स चांगला व्यवसाय करत आहेत. येस बँकेच्या समभागांनी केवळ दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. त्यामुळे तुम्ही बँकेचे शेअर्स विकत घ्यावेत की विकावे? समजून घ्या. येस बँकेच्या शेअर्सच्या तेजीनंतर बाजार तज्ज्ञांनी शेअर अल्प ते मध्यम कालावधीत २८ रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. तज्ज्ञांनुसार हे शेअर्स ‘होल्ड’ केले पाहिजेत.
सेन्सेक्स लाल चिन्हावर बंद, निफ्टीही सपाट
व्यापार आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजार मर्यादित श्रेणीत राहिला. सेन्सेक्स, निफ्टी चढ-उताराच्या दरम्यान फ्लॅट बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी बीएसईचा ३० समभागांचा सेन्सेक्स ५१.१० अंकांनी म्हणजेच ०.०८ टक्क्यांनी घसरून ६२,१३०.५७ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ०.५५ अंकांच्या किंचित वाढीसह १८,४९७.१५ च्या पातळीवर बंद झाला.