मुंबई: विवाहबाह्य प्रेमसंबंध आणि संपत्तीसाठी पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीवर विषप्रयोग केला. आर्सेनिक आणि थॅलियमचं मिश्रण जेवणाच्या माध्यमातून देत काजल शाहनं पती कमलकांत शाह यांना संपवलं. आर्सेनिक आणि थॅलियमचं मिश्रण काजलला तिचा प्रियकर हितेश जैननं आणून दिली होती. कमलकांत यांच्या शरीरात आर्सेनिक आणि थॅलियमचं प्रमाण तब्बल ४०० पट अधिक आढळून आलं. त्यांचे अवयव निकामी होत गेले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. कलमकांत यांच्यावर हळूहळू विषप्रयोग करून त्याला संपवण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र हा विषप्रयोग अपयशी ठरल्यास आरोपींनी प्लान बी तयार ठेवला होता, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.

पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमधील सर्च हिस्ट्री तपासून पाहिली. ‘आरोपींनी विविध प्रकारच्या रसायनांची माहिती वाचली होती. जैनला फार्मसीबद्दल उत्तम माहिती आहे. त्यांच्या सर्चमधून प्लान बी तयार होता हे स्पष्ट दिसतं,’ असं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. सोमवारी आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली.
नवऱ्यावर विषप्रयोग करणारी बायको स्वत:ही केमिकल प्यायली; ब्लड टेस्टचा रिपोर्टही आला, पण…
दोघांच्या फोनमधील ४५ टक्के डेटा मिळवण्यात यश आलेलं आहे. त्यात संशयास्पद गोष्टी आढळून आल्या आहेत. ‘मोबाईलमधील सर्चबद्दल जैनची चौकशी करण्यात आली. त्याची कोठडी संपत आलेली आहे. त्यामुळे तो चौकशीत सहकार्य करत नाहीए,’ अशी माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ९ च्या अधिकाऱ्यांनी दिली. पुराव्यांची विल्हेवाट कशी लावायची, याबद्दलची माहितीदेखील शोधण्यात आली होती. पुराव्यांअभावी गुन्हेगारांची सुटका झाल्याच्या खटल्यांबाबत जैननं सर्च केलं होतं. ‘आपण कधीतरी पकडले जाणार याची कल्पना दोघांना होती. त्यामुळे त्यांनी आधीच सगळं काही शोधून ठेवलं होतं, बऱ्याच गोष्टींची माहिती घेऊन ठेवली होती. त्यामुळे आता त्यांच्याविरुद्ध पुरावे ठोस पुरावे गोळा करणं अवघड होत आहे,’ अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली.
डझनभर टेस्ट वाया; डॉक्टरचं लक्ष केसांकडे जाताच ‘केस’ सॉल्व्ह; विष देणारी बायको गजाआड
मुंबई-नाशिक हायवेवर मोबाईल फेकल्याचा दावा जैननं केला होता. तो मोबाईल अद्याप तरी पोलिसांना मिळालेला नाही. आता जैन पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी इतर ठिकाणांची नावं घेत आहे. कमलकांत यांच्या आईची हत्यादेखील आपणच केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. कमलकांत यांच्या आई सरला देवी यांचा मृत्यू १३ ऑगस्टला झाला. त्यांच्यावरही विषप्रयोग करण्यात आला होता. या हत्येचा तपासदेखील पोलीस करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here