मुंबई : मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त २७ जुलै रोजी दरवर्षी राज्यभरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र करोनाचे संकट असल्याने उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात राबवण्यात येणार आहे. मुंबईत २७ जुलैपासून आठ दिवस हे अभियान चालवण्यात येणार असून त्यामुळे अनेक करोना रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. शिवसेनेचे खासदार यांच्या पुढाकाराने हे अभियान राबविण्यात येणार आहे.

करोनावर अद्यापही प्रभावी लस विकसित झालेली नाही. मात्र, करोनावर मात करून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्माचा (रक्तद्रव) वापर करोनावरील उपचारासाठी यशस्वीरीत्या केला जात आहे. करोना रुग्णांची संख्या आणि प्लाझ्मा दान करणाऱ्यांची संख्या यात असलेली मोठी तफावत कमी करण्याच्या उद्देशाने ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियान’ आयोजित करण्याचा निर्णय खासदार राहुल शेवाळे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या अभियानाची सुरुवात धारावी येथून केली जाणार आहे. करोनावर मात करून पूर्णपणे बरे झालेले धारावीतील नागरिक, डॉक्टर्स, पोलीस आणि पदाधिकारी पहिल्या दिवशी प्लाझ्मा दान करतील. त्यानंतर आठवडाभरात दादर- माहीम, वडाळा, सायन-कोळीवाडा, चेंबूर, अनुशक्तीनगर या दक्षिण- मध्य मुंबईतील इतर विधानसभाक्षेत्रात हे अभियान प्रभावीरित्या राबविले जाणार आहे. तसेच या दरम्यान, प्लाझ्मा दानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे.

पोलीस अधिकारी करणार प्लाझ्मा दान

शेवाळे यांनी प्लाझ्मा दानासाठी केलेल्या आवाहनाला धारावीतील पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. करोनावर मात केलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अभियानाच्या पहिल्या दिवशी प्लाझ्मा दान करणार आहेत.

दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबवून आम्ही उद्धव ठाकरे यांचा जन्मदिन साजरा करतो. यंदाच्या वर्षी करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनी, ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियान’ राबविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. करोनावर विजय मिळविलेल्या नागरिकांनी या अभियानात मोठ्या प्रमाणात सामील व्हावे, या आमच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी मला खात्री आहे.

– खासदार राहुल शेवाळे

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here