fractured freedom award cancelled: कोबाड गांधींच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ राज्य सरकारनं अचानक रद्द केला आहे. सरकारनं तडकाफडकी पुरस्कार रद्द केल्याचे पडसाद आता साहित्य वर्तुळात पाहायला मिळत आहे. सरकारचा निषेध करत ‘भुरा’चे लेखक शरद बाविस्कर यांनी ‘लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार’ नाकारला आहे.

 

sharad
मुंबई: कोबाड गांधींच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ राज्य सरकारनं रद्द केला आहे. सरकारनं तडकाफडकी पुरस्कार रद्द केल्याचे पडसाद आता साहित्य वर्तुळात पाहायला मिळत आहे. सरकारचा निषेध करत ‘भुरा’चे लेखक शरद बाविस्कर यांनी ‘लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार’ नाकारला आहे. प्रौढ वाङ्मय- आत्मचरित्र प्रकारासाठी बाविस्कारांना पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार बाविस्करांनी नाकारला आहे.

कोबाड गांधी हे केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी सदस्य होते. जवळपास दशकभर त्यांनी तुरुंगवास भोगला. तुरुंगवासातून सुटका झाल्यानंतर त्यांनी तुरुंगावासातील आठवणी ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकातून शब्दबद्ध केल्या. या पुस्तकाचा मराठी अनुवाद अनघा लेले यांनी केला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानं ६ डिसेंबरला ३३ साहित्यिकांना यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर केले. त्यात फ्रॅक्चर्ड फ्रीडम’च्या अनुवादक अनघा लेलेंना ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ जाहीर झाला. याला काहीजणांनी सोशल मीडियावरून आक्षेप घेतला. त्यामुळे सरकारनं पुरस्कार रद्द केला. याचे पडसाद आता साहित्य वर्तुळात उमटले आहेत.

सरकारनं एकूण ३३ साहित्यिकांना पुरस्कार घोषित केले. पैकी अनघा लेले यांना जाहीर केलेला पुरस्कार रद्द केला. सरकारच्या या निर्णयाविरोधात प्रा. शरद बाविस्कर यांनी भूमिका घेतली आहे. सरकारनं ३३ साहित्यिकांना पुरस्कार जाहीर केले. त्या यादीत बाविस्कर यांचंदेखील नाव आहे. बाविस्करांच्या भुरा आत्मचरित्राला लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. तो पुरस्कार त्यांनी नाकारला आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात फ्रेंच तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून बाविस्कर कार्यरत आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

1 COMMENT

  1. Right away I am going away to do my breakfast, afterward having my breakfast
    coming yet again to read additional news.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here