Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 13 Dec 2022, 1:45 pm

Solapur News : सोलापूरमध्ये स्वामी समर्थ भक्तांना ऑनलाईन गंडा घातला गेला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भक्तनिवास बुकिंगच्या नावाखाली ही फसवणूक झाली आहे.

 

Solapur Akkalkot Swami Samarth Mandir
बनावट वेबसाईटवरुन ऑनलाईन गंडा; मुंबई, पुण्यातील स्वामी समर्थ भक्तांची फसवणूक

हायलाइट्स:

  • स्वामी समर्थ भक्तांना ऑनलाईन गंडा
  • भक्त निवासाच्या नावाखाली फसवणूक
  • सोलापूरातील अक्कलकोटमधील धक्कादायक प्रकार
सोलापूर : गेल्या काही वर्षांमध्ये सगळंच गोष्टी ऑनलाइन झाल्यामुळे सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्येही तेवढीच वाढ झाली आहे. याचाच प्रत्यय सोलापूरमध्ये स्वामी समर्थ भक्तांना आला आहे. सोलापूरमध्ये स्वामी समर्थ भक्तांना सायबर ठगांनी ऑनलाईन गंडा घातला आहे. भक्तनिवास बुकिंगच्या नावाखाली ही फसवणूक झाली आहे. याबाबत सोलापूर येथील सायबर पोलीस ठाण्यात अजून तरी तक्रार दाखल झाली नाहीय.

सोलापूरमधील अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना भक्तनिवासाच्या बुकिंगच्या नावे गंडा घातला जात असल्याचं समोर आलं आहे. मागील एका महिन्यात अशा अनेक घटना घडल्या असून मुंबई, नवी मुंबई, पुण्यातील भक्तांची फसवणूक झाली आहे. इंटरनेटवर भक्तनिवासाची माहिती शोधून ऑनलाईन बुकिंग करणारे भक्त या सायबर गुन्हेगारांकडून नाडले जात आहेत. अशाच प्रकारे रोज २० ते २५ जणांच्या फसवणुकीच्या तक्रारी येत असल्याचंही व्यवस्थापनाने स्पष्ट केलं आहे. याची तक्रार केली असता, आता या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

भारतीय कंपन्यांमध्ये ‘चीनी’ घुसखोरी; संसदेत धक्कादायक आकडेवारी आली समोर
श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान यांच्यामार्फत भक्तनिवास चालवलं जातं. मात्र, त्याची कोणतेही अधिकृत वेबसाईट नाही. तरी देखील सायबर गुन्हेगार बनावट वेबसाईट तयार करून फसवणूक करत आहेत. त्यामुळे स्वामी समर्थ भक्त अक्कलकोटला जाणार असाल तर सावध रहा. कारण भक्त निवासाची कोणतीही अधिकृत वेबसाईट नाही.

‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ला मिळालेला पुरस्कार रद्द; राज्य सरकारचा पुरस्कार बाविस्करांनी नाकारला

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here