मुंबई: टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्सवरून तर हे कमी अधिक प्रमाणात निश्चितच झालं होतं की या दोघांमध्ये काहीतरी नक्कीच बिनसलं आहे. या दोघांबाबत विविध प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. तथापि, अद्यापपर्यंत दोन्ही बाजूंकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही की ते खरोखरच त्यांचे १२ वर्षांचे नाते संपवत आहेत.

त्यांच्या या घटस्फोटाच्या चर्चदरम्यान त्यांनी त्यांचा मिर्झा-मलिक शो येणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे अनेक लोक त्यांच्या घटस्फोटाला केवळ प्रसिद्धी स्टंट म्हणत आहेत. बरेच लोक असेही म्हणत आहेत की ते फक्त त्यांच्या आगामी ओटीटी शोच्या प्रमोशनसाठी हे सर्व करत आहेत आणि आता या अफवांच्या दरम्यान, शोएब मलिकच्या इंस्टाग्राम बायोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

वाचा: टीम इंंडियाच्या मॅचसाठी स्टेडियममध्ये मोफत प्रवेश; कधी, कुठे, केव्हा वाचा सविस्तर माहिती

सानिया मिर्झासह घटस्फोटाच्या अफवांमध्ये शोएब मलिकने इन्स्टाग्राम बायोमध्ये बदल केला आहे आणि हा बदल पाहून सर्वच जण चकित झाले आहेत. जिथे अलीकडेच शोएबने ई टाइम्सला सांगितले की, त्याच्या आणि सानियामध्ये काहीच ठीक नसल्याचे त्याने सांगितले, परंतु आता शोएबच्या इन्स्टा बायोने या प्रकरणाचा चेहरा मोहराच बदलला आहे.

शोएबने त्याच्या इंस्टा हँडलच्या बायोमध्ये लिहिले, अॅथलीट, एका सुपरवुमनचा पती, त्याचा मुलगा हाच त्याचा खरा आशीर्वाद, असे त्याने त्याच्या बायोमध्ये म्हटले आहे. बायो बदलल्यानंतर आता चाहत्यांच्या प्रतिक्रियाही बदलल्या आहेत. शोएबने इंस्टा बायोमध्ये सानियाला सुपरवुमन म्हणत तिला टॅग केल्याने चाहत्यांनी म्हटलेले खरे झाले असल्याचा चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा: IND vs BAN:पहिल्या कसोटीत भारत पाडणार धावांचा पाऊस; काय आहे टीम इंडियाचे नवं

Shoaib Malik Instagram Bio

सौजन्य – इंस्टाग्राम

वाचा: दुसऱ्या टी-२० सामन्यात अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड, पाहा टीम इंडियाची नवी कामगिरी

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील शोमध्ये एकत्र दिसणार

याआधी शोएब मलिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये तो पत्नी सानिया मिर्झासोबत दिसत होता. दोघे नवीन OTT शो ‘द मिर्झा मलिक शो’ घेऊन येत आहेत. हा एक म्युजिकल सेलिब्रिटी टॉक शो आहे. सानिया आणि शोएब एकत्र शो होस्ट करताना दिसणार आहेत. हा व्हिडिओ समोर येताच लोकांनी त्याला प्रचंड ट्रोल केले. स्टार कपलच्या घटस्फोटाच्या बातमीवर सगळेच प्रश्न विचारताना दिसले. टिप्पणी करताना एकाने लिहिले,’ कसे लोक आहेत? शो हिट व्हावा यासाठी स्वतःच्याच घटस्फोटाच्या अफवा पसरवत आहेत. तर एकाने विचारले, ‘ घटस्फोट झाला का?’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here