1st accident on Samruddhi highway : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण झालेल्या महत्त्वाकांक्षी पहिल्या टप्प्यातील समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याचे वृत्त आहे. भरघाव वेगाने जाणाऱ्या एका मर्सिडीज बेंझ कारने स्विफ्ट कारला धडक दिली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गेल्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या (पहिला टप्पा) लोकार्पणाला सोहळा पार पडला.

आज घडलेल्या अपघातात लाल रंगाच्या स्विफ्ट कारचे मोठे नुकसान झाले आहे. मर्सिडीज बेंझ कारने या स्विफ्टकारला पाठिमागून धडक दिली आहे. या कारचा कारनंबर तपासला असता ही कार समद शेख नावाच्या व्यक्तीची आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट कार टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी थांबली होती. त्याचवेळी भरधाव येणाऱ्या एका मर्सिडीज बेंझ कारने उभ्या असलेल्या या स्विफ्ट कारला मागून धडक दिली. मर्सिडीज बेंझ या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.