मेक्सिकोमध्ये वास्तव्यास असणाऱ्या एंड्रेस मोरेनो यांचा स्थूलपणा वाढत गेला. वजन वाढत ४४४ किलोपर्यंत पोहोचलं. वजन कमी करण्यासाठी त्यांनी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर त्यांचं वजन १२० किलोपर्यंत कमी झालं. मात्र यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

एंड्रेस मोरेनो यांचं वजन २०१५ मध्ये ४४४ किलो इतकं होतं. त्यामुळे ते जगातील सर्वाधिक लठ्ठ व्यक्ती होते. जन्माच्या वेळी साधारणत: बाळांचं वय २.८ ते ३.२ किलो असतं. मात्र मोरेनो यांचा जन्म झाला त्यावेळी त्यांचं वजन ५.८ किलो होतं. वयाच्या वर्षी वजन ८२ किलोंपर्यंत पोहोचलं. मोरेनो यांना मधुमेहाचा त्रास सुरू झाला. पुढे ते पोलीस अधिकारी झाले. वजन वाढल्यानंतर आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या.
शारीरिक समस्या वाढल्यामुळे मोरेनो यांच्या पत्नीनं त्यांची साथ सोडली. मोरेनो दिवसागणिक जाड होऊ लागले. त्यामुळे पत्नीनं लठ्ठ म्हणत त्यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मोरेनो यांचे मित्र आणि कुटुंबियांनी तिची अनेकदा भेट घेतली. मोरेनो यांच्या प्रकृतीची माहिती त्यांना दिली. पत्नीनं साथ सोडल्याचा मोरेनो यांना प्रचंड त्रास झाला. ते तणावाखाली होते. वजन वाढल्यानंतर मोरेनो यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्यांनी अनेक गंभीर आजार झाले. वजन कमी करण्यासाठी त्यांनी बायपास सर्जरी केली. डॉक्टकांनी जवळपास ७० टक्के पोट काढलं. मृत्यूच्या एक दिवस आधी मोरेनो सहा एमर्जी ड्रिंक प्यायले. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.