Police Transfer News : राज्यातील पोलीस दलात मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. याबाबत राज्य सरकारने पत्रक जारी करून माहिती दिली आहे. या बदल्यांमध्ये अमिताभ गुप्ता, विश्वास नांगरे पाटील यांच्यासर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या या बदल्यांनी आणि पदोन्नतीची आता जोरदार चर्चा आहे.

मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली गेली आहे. मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था ) असलेले विश्वास नांगरे पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती करण्यात आली आहे. विनाय कुमार चौबे यांची या पदावरून बदली झाल्याने या रिक्तपदावर नांगरे पाटील यांची बदली करण्यात आली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
thanks for sharing.bobcat knife