मुंबईः कमी चाचण्यांमुळेच राज्यातील करोनाचा संसर्ग वाढत असून मृत्यूंचे प्रमाण देखील वाढत आहे. आता राज्यातील नागरिकांचे मृत्यू रोखण्यासाठी अधिक चाचण्या करण्याचा एकमेव उपाय राज्य सरकारकडे असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांनी केला आहे. करोना चाचण्या, त्यातून येणारे पॉझिटिव्ह रूग्ण, दैनंदिन संसर्गाचे आणि मृत्यूचे प्रमाण याचा मुंबई आणि महाराष्ट्राचा आलेख त्यांनी मांडला आहे. (devendra fadanvis on COVID 19 testing Infection rate)

करोना चाचण्या सातत्याने कमी करण्यामुळे आपण काय कमाविले आणि काय गमाविले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील संसर्गाचा दर अगदी सुरुवातीला ६ ते ७ टक्के होता, तो ८ जूनपर्यंत १७-१८ टक्क्यांवर आला आणि आता २३ ते २४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळं १०० चाचण्यांमधुन २४ जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट होत आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुंबईच्या परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलं आहे. मुंबईतील संसर्गाचा दर सातत्याने २१ ते २७ टक्क्यांवर स्थिरावलेला आहे. चाचण्यांची संख्या अतिशय कमी आहे. १ ते १९ जुलैच्या दरम्यानची सरासरी काढली तरी केवळ ५५०० चाचण्या दररोज होत आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईतील कोरोनाबळींची संख्या दररोज सरासरी तेवढीच असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

नवी दिल्लीतील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आणि चाचण्यांची संख्या वाढविल्यानंतरची संसर्गाचा दर ३० ते ३५ टक्क्यांहून आता ६ टक्क्यांवर आलेला आहे आणि करोना बळींच्या संख्येतही घट झाली आहे. असे असले तरी कोरोना चाचण्यांची संख्या तरीही दररोज कायम ठेवण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात चाचण्यांना दुसरा कोणताही पर्याय नाही. कोरोनावर मात करण्याचा, रूग्णसंख्या कमी करण्याचा आणि राज्यातील नागरिकांचे मृत्यू रोखण्याचा एकमात्र उपाय म्हणजे अधिकाधिक चाचण्या, संशयितांचे विलगीकरण हे आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here